ग्रामीण भागातील रूग्णांना फिरत्या दवाखान्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:12+5:302021-07-11T04:15:12+5:30

लातूर : तालुक्यातील जवळा बु येथे दिशा प्रतिष्ठानतर्फे आठवडा बाजारादिवशी रूग्णांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी फिरता दवाखाना हा उपक्रम ...

Mobile clinic support for patients in rural areas | ग्रामीण भागातील रूग्णांना फिरत्या दवाखान्याचा आधार

ग्रामीण भागातील रूग्णांना फिरत्या दवाखान्याचा आधार

लातूर : तालुक्यातील जवळा बु येथे दिशा प्रतिष्ठानतर्फे आठवडा बाजारादिवशी रूग्णांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी फिरता दवाखाना हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याचा प्रारंभ अभिजित देशमुख यांच्या हस्ते झाला.

यावेळी दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले, उपाध्यक्ष दिनेश गोजमगुंडे, सचिव जब्बार पठाण, ॲड. वैशाली यादव, इसरार सगरे, डाॅ. दिग्विजय शिंदे, ज्ञानेश्वर भिसे, जवळा गावचे सरपंच चनबस भुजबळ, उपसरपंच मनोज कापरे, माजी सरपंच लक्ष्मणराव खुणे, दैवशाला राजमाने, दत्ता बनाळे उपस्थित होते.

यावेळी अभिजित देशमुख म्हणाले, फिरता दवाखाना हा कायमस्वरुपी आपल्या सेवेत राहणार आहे. फिरता दवाखाना व्हॅनचे स्वागत गंगाधर चौंडे, ग्रामसेवक विठ्ठल चौथवे, बाबू राडकर, सचिन चौंडे, गजानन पाटील, इंदुबाई पोतदार, सचिन लोमटे, नरसिंग चौंडे यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता बनाळे यांनी केले तर उपसरपंच मनोज कापरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता खुणे, सुरज लोंढे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Mobile clinic support for patients in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.