घरगुती वादात मध्यस्थी जीवघेणी ठरली; नातवाने केला डाेक्यात दांडा घालून आजीचा खून

By राजकुमार जोंधळे | Updated: June 17, 2023 19:27 IST2023-06-17T19:27:36+5:302023-06-17T19:27:53+5:30

पाेलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे

Mediation in domestic disputes proved fatal; The grandson killed the grandmother with a stick | घरगुती वादात मध्यस्थी जीवघेणी ठरली; नातवाने केला डाेक्यात दांडा घालून आजीचा खून

घरगुती वादात मध्यस्थी जीवघेणी ठरली; नातवाने केला डाेक्यात दांडा घालून आजीचा खून

उदगीर (जि. लातूर) : भांडण सुरू असताना मध्यस्थी करणाऱ्या आजीच्या डाेक्यात नातवाने रागाच्या भरात लाकडी दांडा घालून खून केल्याची घटना बनशेळकी शुक्रवारी रात्री उशिरा घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात शनिवारी सकाळी नातवाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे.

पाेलिसांनी सांगितले, लक्ष्मीबाई महादेव रोडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, उदगीर तालुक्यातील बनशेळकी येथे शुक्रवारी रात्री फिर्यादीची आई आणि भाऊ बोलत बसले होते. दरम्यान, फिर्यादीचा भाचा श्याम संजीव आवाळे (वय २६ रा. बनशेळकी) हा दारूच्या नशेत घरी आला. फिर्यादीला तू येथे का राहतेस? म्हणून शिवीगाळ सुरू करत वादावादी केली. त्यावेळी श्यामचे वडील त्याला समजावत असताना ६५ वर्षीय आजी हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत हाेती. यावेळी आराेपीने रागाच्या भरात लाकडी दांडा घेऊन आजीच्या डोक्यात जोराने घातला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आजीचा मृत्यू झाला. 

याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात मयताची मुलगी लक्ष्मीबाई महादेव रोडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्याम संजीव आवाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Mediation in domestic disputes proved fatal; The grandson killed the grandmother with a stick