मी कधीच जातिवाद केला नाही, मराठा आरक्षणासोबतच सर्वांच्या प्रश्नांसाठी लढणार: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 20:11 IST2026-03-12T20:10:46+5:302026-03-12T20:11:07+5:30

धनगर, मुस्लिम आणि दलित बांधवांसाठीही लढणार, जरांगे-पाटलांचा हुंकार

Manoj Jarange-Patil in Latur: 'Will Fight for the Issues of All Communities, Give Me One Year' | मी कधीच जातिवाद केला नाही, मराठा आरक्षणासोबतच सर्वांच्या प्रश्नांसाठी लढणार: मनोज जरांगे

मी कधीच जातिवाद केला नाही, मराठा आरक्षणासोबतच सर्वांच्या प्रश्नांसाठी लढणार: मनोज जरांगे

निलंगा (जि. लातूर): "माझ्याकडे धनगर, मुस्लिम, दलित अथवा इतर कोणत्याही समाजातील व्यक्ती आली, तरी मी कधीच जातिवाद केला नाही. मराठा आरक्षणासोबतच सर्व सामान्यांचे दैनंदिन प्रश्न सोडवणे ही आमची जबाबदारी आहे. मला फक्त एक वर्ष द्या, तुमचे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही," अशी ग्वाही मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिली.

आध्यात्मिक मंचावरून आंदोलनाचे बळ
निलंगा तालुक्यातील माकणी (थोर) येथे श्री हनुमान आराधना कार्यक्रमानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. जरांगे-पाटील म्हणाले की, मराठा समाजातील गोरगरिबांची मुले मोठ्या पदावर जावीत, हाच माझा ध्यास आहे. जोपर्यंत 'सगेसोयरे'नुसार पूर्ण आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. हा राजकीय मंच नसून आध्यात्मिक मंच आहे आणि येथील श्रद्धा मला भविष्यातील संघर्षासाठी बळ देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भव्य मिरवणुकीने माकणी दुमदुमली
सभेपूर्वी गावातून मारुती मंदिरापर्यंत मनोज जरांगे-पाटील यांची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारो समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घोषणाबाजी केली. या सभेत त्यांनी केवळ मराठा समाजापुरते मर्यादित न राहता सर्वसमावेशक नेतृत्वाची भूमिका मांडल्याने राजकीय वर्तुळात या भाषणाची चर्चा रंगली आहे.

Web Title : कभी जातिवादी नहीं, सबके लिए लड़ूंगा: मनोज जरांगे

Web Summary : मनोज जरांगे-पाटिल ने मराठा आरक्षण के साथ सबके मुद्दे उठाने का वादा किया। माकणी में बोलते हुए, उन्होंने समावेशिता पर जोर दिया और समस्याओं को हल करने के लिए एक वर्ष मांगा। उन्होंने मराठा प्रगति और 'सगे सोयरे' आरक्षण के प्रति अपनी प्रतिबद्धता जताई, आध्यात्मिक सभाओं से शक्ति प्राप्त की।

Web Title : Never casteist, will fight for all: Manoj Jarange

Web Summary : Manoj Jarange-Patil vowed to address everyone's issues alongside Maratha reservation. Speaking at Makani, he emphasized inclusivity and sought one year to resolve problems. He highlighted his commitment to Maratha progress and 'Sage Soyare' reservation, drawing strength from spiritual gatherings.