महाराष्ट्र विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:20 IST2021-07-30T04:20:50+5:302021-07-30T04:20:50+5:30
अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक पंडितबापू भोसले होते. यावेळी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, महावितरणचे उपविभागीय अधिकारी ढाकणे, ...

महाराष्ट्र विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक पंडितबापू भोसले होते. यावेळी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, महावितरणचे उपविभागीय अधिकारी ढाकणे, उपअभियंता इंगळे, भाऊसाहेब लाळे, अविनाश सरडे, संभाजी बाबळसुरे आदी उपस्थित होते. विद्यालयातील प्रथम प्रगती भाऊसाहेब लाळे, द्वितीय संपदा संभाजी बाबळसुरे, तृतीय साक्षी अविनाश सरडे यांचा पालकांसह शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळेचा एकूण निकाल १०० टक्के लागला असून १८६ पैकी ३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले आहेत. ४२ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण तर ९१ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतले आहेत.
गुणवंतांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष प्रदीप जगताप, सचिव अरविंद भोसले आदींनी केले. प्रास्ताविक प्राचार्य सतीश भोसले यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश सुभेदार यांनी केले. आभार गजानन तनशेट्टी यांनी मानले.