शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात एकाने पेट्रोल ओतून घेतले, शहरासह जिल्ह्यात कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 19:17 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लातूरसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

 लातूर - औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लातूरसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. हॉटेल, टपरी, शाळा-महाविद्यालये बंद होती. एस.टी.ही रस्त्यावरून धावली नाही. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गटा-गटाने मोटारसायकलवर फिरून बंदचे आवाहन करीत होते. दरम्यान, शिवाजी चौकात एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. औसा येथे पंढरपूरहून आलेल्या एका बसवर दगडफेक झाली असून, सिरसल येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जळकोट तालुक्यातील घोणसी येथेही रास्ता रोको आंदोलनादरम्यान एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. उदगीर येथे तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी दिवसभर ठिय्या आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. रेणापूर येथील पिंपळफाटा, खरोळा येथे आंदोलनकर्त्यांनी काही वेळ रास्ता रोको केला. लातूर शहरातील शिवाजी चौकात अमोल जगताप या कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. तसेच शहरात एक रुग्णालय, एक हॉटेल आणि दोन व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक झाली. शिवाय, प्रवासी वाहतूक करणाºया चार वाहनांवरही औसा रोड, रेणापूर नाका आणि विवेकानंद चौक परिसरात दगडफेक झाली. शिक्षण उपसंचालकांना घेराव... ५० टक्के शैक्षणिक सवलतींचा शासन अध्यादेश दाखवा, या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी शिक्षण उपसंचालकांना घेराव घातला. दरम्यान, शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांनी असा कोणताही शासन अध्यादेश नसल्याचे आंदोलकांना सांगितले व त्याची लेखीही दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. एकही बस धावली नाही... लातूर, उदगीर, निलंगा, अहमदपूर आणि औसा आगारांतून मंगळवारी एकही बस धावली नाही. सकाळी ७ वाजेपासून बंद आंदोलनाला सुरुवात झाल्याने एस.टी. प्रशासनाने बस न सोडण्याचा निर्णय घेतला होता. सायंकाळी ६ वाजेपर्यंत बसेस बंद होत्या.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदnewsबातम्या