शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : भाजपतर्फे शृंगारे, काँग्रेसतर्फे कामत; लातुरात युती, आघाडीचे उमेदवार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 15:11 IST

अमित शहा यांच्या दौऱ्यातच गायकवाड यांच्या उमेदवारीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

ठळक मुद्देभाजपकडून उदगीरचे आ. सुधाकर भालेराव यांचे नावही काही काळ चर्चेत होते. कॉंग्रेसतर्फे शनिवारी रात्री कामत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 

- हणमंत गायकवाड

लातूर : भारतीय जनता पार्टीने अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या उमेदवाराचा चेहरा बदलला असून, विद्यमान खा.डॉ. सुनील गायकवाड यांना तिकीट नाकारले आहे. जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे हे भाजपाचे उमेदवार असतील.   काँग्रेसने शनिवारी रात्री उमेदवारांची घोषणा केली असून मच्छिंद्र कामत यांचे नाव जाहीर करण्यात आले. 

भाजपतर्फे सुधाकर शृंगारे यांच्या उमेदवारीचे पारडे जड करण्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि लोकसभा मतदारसंघातील आमदारांचा मोलाचा वाटा आहे. खा. गायकवाड हे मलाच तिकीट मिळणार, असे वारंवार सांगत राहिले. त्यांचे प्रगतीपुस्तकही बरे होते. संसदीय कामकाज आणि सभागृहातील उपस्थितीत ते पुढे होते, असा त्यांचा दावा होता. अडीच लाखांच्या फरकाने ते विजयीही झाले होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांत नाराजीचा सूर उमटत होता. अमित शहा यांच्या दौऱ्यातच गायकवाड यांच्या उमेदवारीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

दरम्यान, उदगीरचे आ. सुधाकर भालेराव यांचे नावही काही काळ चर्चेत होते. दिल्ली दरबारात व नितीन गडकरी यांच्याकडून आपल्यालाच आशीर्वाद असल्याचा दावा शेवटपर्यंत गायकवाड करीत राहिले. त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियात संदेश फिरत असतानाच शृंगारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मुंबईत कंत्राटदार असणारे शृंगारे आता पक्षाची मोट कशी पाठीशी ठेवतात आणि कसा प्रचार रंगतो, हे रंगपंचमीनंतर कळणार आहे. दुसरीकडे काँग्रेसतर्फे डॉ. शिवाजी काळगे, मच्छिंद्र कामत, पृथ्वीराज सिरसाट आणि संजय बनसोडे ही नावे चर्चेत होती. शनिवारी रात्री कामत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 

कोण आहेत शृंगारे? सुधाकर शृंगारे हे मूळचे चाकूर तालुक्यातील घरणी गावचे आहेत. ते वडवळ नागनाथ जिल्हा परिषद गटातून निवडून आले. राजकारणात नवखे आहेत. मात्र, पालकमंत्री संभाजी निलंगेकर आणि लोकसभा मतदारसंघातील आमदारांचा त्यांना प्रारंभापासूनच पाठिंबा मिळाला आहे. त्यांनी उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयातून बी.ए. केले. शिक्षणानंतर रोजगारासाठी ते बंगळुरूला गेले. नंतर त्यांनी मुंबई येथे कंत्राट व्यवसायात जम बसविला.

उमेदवाराचे नाव चुकल्याने संभ्रमलोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी घोषित करताना यादीमध्ये सुधाकर भालेराव शृंगारे, असे नमूद केले. शृंगारे यांच्या वडिलांचे नाव तुकाराम आहे. शिवाय, सुधाकर भालेराव हे उदगीरचे आमदार असून ते स्वत:ही इच्छुक होते. त्यामुळे यादी जाहीर झाल्यानंतर भालेराव की शृंगारे ही चर्चा काही वेळ रंगली; परंतु सुधाकर शृंगारे यांचेच नाव अंतिम असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा