भरधाव ट्रकने दुचाकीला उडविले; दोघे जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:23 IST2021-08-23T04:23:14+5:302021-08-23T04:23:14+5:30
पाेलिसांनी सांगितले, मुरुडकडून लातूरच्या दिशेने रविवारी सायंकाळी स्कुटीवरून भीमराव सूर्यभान मस्के (३० रा. उजनी, जि. बीड) आणि फिरोज हयातखान ...

भरधाव ट्रकने दुचाकीला उडविले; दोघे जण ठार
पाेलिसांनी सांगितले, मुरुडकडून लातूरच्या दिशेने रविवारी सायंकाळी स्कुटीवरून भीमराव सूर्यभान मस्के (३० रा. उजनी, जि. बीड) आणि फिरोज हयातखान पठाण (४५ रा. बरकतनगर, लातूर) निघाले होते. दरम्यान, लातूर ते बार्शी महामार्गावरील साखरापाटी येथे आल्यानंतर भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (एम.एच. ३४ बी.जी. ८११९) जोराची धडक दिली. या अपघातात स्कुटीवरील दोघे जण ठार झाले. घटनास्थळी गातेगाव पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. अशी माहिती पाेलीस उपनिरीक्षक किशाेर कांबळे यांनी दिली. याबाबत गातेगाव पाेलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नाेंद करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.
चंद्रपूरकडे निघाला हाेता ट्रक...
चंद्रपूर येथून हा ट्रक पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे कादाच्या राेलची वाहतूक करत हाेता. दरम्यान, भिगवण येथून ते चंद्रपूरच्या दिशेने निघाले हाेते. दरम्यान, त्यांनी बारानंबर पाटी येथील एका हाॅटेलवर जेवण केले. रात्री साखरा पाटी येथील पेट्राेलपंपावर मुक्काम करुन साेमवारी पहाटे चंद्रपूरकडे निघाण्याचा चालकाचा बेत हाेता. दरम्यान, बारानंबर पाटी येथून पेट्राेल पंपाकडे येताना हा अपघात झाला, असेही पाेलीस उपनिरीक्षक कांबळे म्हणाले.