एकदिलाने भाजपाचे संघटन मजबूत करू : अरविंद निलंगेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST2021-06-25T04:15:54+5:302021-06-25T04:15:54+5:30

प्रदेश सचिवपदी निवडीबद्दल त्यांचा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह, पक्ष पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आशिव येथे अरविंद पाटील निलंगेकर ...

Let's strengthen BJP's organization with one heart: Arvind Nilangekar | एकदिलाने भाजपाचे संघटन मजबूत करू : अरविंद निलंगेकर

एकदिलाने भाजपाचे संघटन मजबूत करू : अरविंद निलंगेकर

प्रदेश सचिवपदी निवडीबद्दल त्यांचा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह, पक्ष पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आशिव येथे अरविंद पाटील निलंगेकर यांचे ग्रामपंचायतीसह जिल्हा परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्षा भारतबाई साळूुके, सभापती गोविंद चिलकुरे, रोहिदास वाघमारे, जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, चेअरमन दगडू साळूंके, निलंगा पंचायत समिती सभापती राधा बिराजदार, अ‍ॅड. संभाजीराव पाटील, निलंग्याचे उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, शरद पेठकर, शहराध्यक्ष अ‍ॅड. विरभद्र स्वामी, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानेश्वर चेवले यांनीही त्यांचा सत्कार केला.

लातूर शहरात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वराचे दर्शन घेऊन अरविंद पाटील निलंगेकर यांनी महाआरती केली. त्यानंतर गोलाई येथील जगदंबा देवीचे दर्शन घेऊन येथेही आरती करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड, मनपा गटनेते अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, मनीष बंडेवार, शिरीष कुलकर्णी, प्रवीण सावंत, स्वाती जाधव, मीना भोसले, भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, प्रदेश भाजपाच्या प्रेरणा होणराव, अ‍ॅड. जयश्री पाटील, नगरसेवक व्यंकट वाघमारे, शैलेश स्वामी, संगीत रंदाळे, सभापती मंगेश बिराजदार, नगरसेविका दीपा गिते, शीतल मालू, रागिनी यादव, श्वेता लोेंढे, शोभा पाटील, स्वाती घोरपडे आदींसह नगरसेवक, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी अरविंद पाटील निलंगेकर यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवत जिल्ह्यासह राज्यभरात पक्षसंघटन वाढवून पक्षाची विचारधारा समाज घटकापर्यंत पोहचविण्यासाठी एकदिलाने काम करून पुढील काळात भाजपाची विजयी पताका फडकावू, असा विश्वास व्यक्त केला.

Web Title: Let's strengthen BJP's organization with one heart: Arvind Nilangekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.