डिग्रसच्या सरपंचपदी लक्ष्मण बावाचकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:14 IST2021-01-01T04:14:18+5:302021-01-01T04:14:18+5:30
२०१७-२०१८ मध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदाचे आरक्षण ओबीसी पुरुषाला सुटले होते. त्यावेळी सार्वत्रिक निवडणूक जनतेतून सरपंचपदाची निवड करण्यात आली ...

डिग्रसच्या सरपंचपदी लक्ष्मण बावाचकर
२०१७-२०१८ मध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदाचे आरक्षण ओबीसी पुरुषाला सुटले होते. त्यावेळी सार्वत्रिक निवडणूक जनतेतून सरपंचपदाची निवड करण्यात आली हाेती. श्रीकांत कोंपले हे थेट जनतेतून निवडून आल्याने त्यांची सरपंचपदी वर्णी लागली. त्यांनी पदाचा गैरवापर केला, म्हणून त्यांच्यावर आरोप झाले होते. लातूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरवले होते. दरम्यान, याविराेधात उच्च न्यायालयात अपील करण्यात आले हाेते. अंतिम सुनावणीनंतर उच्च न्यायालयानेही त्यांना अपात्र घोषित केले. परिणामी, डिग्रस येथील सरपंचपद रिक्त झाले होते.
सरपंचपदाच्या निवडीचे आदेश दिल्याने सदरची निवड प्रक्रिया नायब तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
सरपंच म्हणून लक्ष्मण गोपाळ बावाचकर यांची तर उपसरपंच म्हणून प्रमाेद पाटील यांची यावेळी निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामसेवक जानताने, तलाठी अनुराधा आनगले, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद गायकवाड, मारोती डोंबाळे, अहिल्याबाई माने, जयश्री ढगे, विविध कार्यकारी सोसायटीने चेअरमन शिरीषकुमार पाटील, रामेश्वर ढगे, विजयकुमार माने, बालाजी इंटेवाड यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती हाेती. नूतन सरपंच, उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला.