सदस्यता नोंदणी अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:35 IST2020-12-15T04:35:58+5:302020-12-15T04:35:58+5:30
बोरी येथे शृंगारे, भिसे यांचा झाला सत्कार लातूर : तालुक्यातील बोरी येथे सहाय्यक अभियंता अमित शृंगारे व तुकाराम भिसे ...

सदस्यता नोंदणी अभियानास प्रारंभ
बोरी येथे शृंगारे, भिसे यांचा झाला सत्कार
लातूर : तालुक्यातील बोरी येथे सहाय्यक अभियंता अमित शृंगारे व तुकाराम भिसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वामनराव पाटील, दगडूसाहेब पडिले, फरमान शेख, शंकरराव पाटील, बंडू पाटील, अंकुश बेंबडे, उद्धव कदम, श्रीधर बंडे, माधव कांबळे, प्रल्हाद खुर्दळे, विलास भालके, एकनाथ केजकर, गोविंद कदम, दिगंबर कदम, शिवाजी स्वामी आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कारेपूर रोड येथून दुचाकीची चोरी; गुन्हा दाखल
लातूर : कारेपूर रोड येथे घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी घडली. पोलिसांनी सांगितले, फिर्यादी तानाजी चंद्रकांत माने यांनी कारेपूर रोड येथील घरासमोर आपली दुचाकी (एमएच २४ एक्यू ९३९४) पार्किंग केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. या प्रकरणी माने यांच्या तक्रारीवरून चाकूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोह. राख करीत आहेत.
वातावरणात बदल
लातूर : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून, थंडी कमी झाली आहे. कधी ढगाळ तर कधी ऊन पडत आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होत असून, अनेक ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. जिल्ह्याचे किमान तापमान १९ अंशांवर पोहोचले असून, थंडी कमी झाली असल्याचे चित्र आहे.
वाहनधारक त्रस्त
लातूर : लातूर ते हरंगुळ रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्ता खचला असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त असून, अवजड वाहनांची रेलचेल असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
क्रीडा संकुल परिसरातून दुचाकी लंपास
लातूर : शहरातील क्रीडा संकुलातील पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी फिर्यादी शिवलिंग मन्मथप्पा उटगे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी वाॅकिंगसाठी क्रीडा संकुलात गेले होते. परत आले असता त्यांना दुचाकी आढळून आली नाही.
महाराष्ट्र विद्यालयात अभिवादन कार्यक्रम
लातूर : शहरातील मजगेनगर येथील महाराष्ट्र विद्यालयात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्था अध्यक्ष माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बापूसाहेब गोरे, प्राचार्य गोविंद शिंदे, अनिल सोमवंशी, कमलाकर कदम, रवींद्र जगदाळे, बाळासाहेब जाधव, सूर्यकांत चव्हाण, प्रा. राधा कवरे, अब्दुल गालिब शेख, आर्य काळे, मनाळे, कांबळे आदींसह महाराष्ट्र विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.