लातूर : जन्मापासून कर्णदोष निर्माण झाल्याने जगाच्या आवाजापासून अनभिज्ञ असलेल्या दोन कर्णबाधीर बालकांवर मोफत कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया शनिवारी करण्यात आली आहे. आता ही बालके सप्तस्वर ऐकत आयुष्याची नवी सुरुवात करणार आहेत. त्यामुळे कुटुंबांत मोठा आनंद पसरला आहे.
लातूर तालुक्यातील ज्योतिराम शिंदे यांचा मुलगा कार्तिक व निलंगा तालुक्यातील सांगवी जेवरी येथील जीवन पाटील यांचा मुलगा मन्मथ हा कर्णबधीर आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत पालकांनी जिल्हा परिषदेकडे धाव घेतली. जिल्हा परिषदेचे सीईओ राहुलकुमार मीना यांनी ५ टक्के दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत विशेष आर्थिक तरतुदीतून या बालकांवर कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार शहरातील प्रसिद्ध कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. आनंद गोरे, डॉ. सुधीर कदम यांनी ही शस्त्रक्रिया केली.
ही शस्त्रक्रिया लवकर व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा उषाताई पाटील- तळेगावकर, उपाध्यक्ष दयानंद सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, डॉ. हर्षदा गोरे, अमोल झेंडे, डॉ. रफी गातेगावकर, डॉ. शितल चव्हाण, डॉ. राजू गायकवाड, बाळासाहेब वाकडे, ॲड. बसवेश्वर पसारे, शिरिषकुमार शेरखाने यांनी प्रयत्न केले.
अत्यंत महागडी शस्त्रक्रियाकॉक्लीअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया अत्यंत महागडी असल्याने सामान्य, गरीब कुटुंबांना ती परवडणारी नसते. जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग आणि दिव्यांग सक्षमीकरण विभागाने पुढाकार घेऊन गरीब कुटुंबांतील दोन बालकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतला.
दिव्यांग समाजाच्या मुख्य प्रवाहातआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. त्यामुळे अडचणीत पालकांना मदत होण्याबरोबर दिव्यांग समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होत आहे.- राहुलकुमार मीना, सीईओ.
Web Summary : Latur Zilla Parishad funded cochlear implant surgeries for two deaf children from poor families. The children, previously unable to hear, will now experience sound, bringing joy to their families. The initiative helps disabled individuals join the mainstream society.
Web Summary : लातूर जिला परिषद ने गरीब परिवारों के दो बधिर बच्चों के लिए कर्णावत प्रत्यारोपण सर्जरी का वित्तपोषण किया। बच्चे, जो पहले सुनने में असमर्थ थे, अब ध्वनि का अनुभव करेंगे, जिससे उनके परिवारों में खुशी आएगी। यह पहल विकलांग व्यक्तियों को मुख्यधारा के समाज में शामिल होने में मदद करती है।