शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यातील मुले शिकणार AI; इंग्रजीत साधणार संवाद! लातूर झेडपीच्या अर्थसंकल्पात खास तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 19:34 IST

जिल्हा परिषदेचा ३७ कोटी ७८ लाखांचा अर्थसंकल्प मंजूर

लातूर : आजच्या एआयच्या दुनियेत खेड्यातील मुलेही आघाडीवर रहावीत तसेच एकल महिलांचे जीवनमान उंचावे म्हणून जिल्हा परिषदेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी विशेष तरतूद आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकात केली आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचा प्रगतीला आणखीन चालना मिळणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक राहुलकुमार मीना यांच्यासमोर प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र नागणे यांनी जिल्हा परिषदेचा सन २०२६- २७ चा ५५ कोटी ६२ लाख ८३ हजार १३३ रुपयांच्या जमेचा आणि ३७ कोटी ७८ लाख ६१ हजार रुपये खर्चाचा अर्थसंकल्प गुरुवारी सादर केला. तो प्रशासक राहुलकुमार मीना यांनी मंजूर केला.

कोणत्या विभागांसाठी किती रुपयांची तरतूद...विभाग - रक्कमसमाजकल्याण - २ कोटी १९ लाखदिव्यांग कल्याण - २ कोटी ४२ लाखमहिला व बालकल्याण - १ कोटी ६६ लाखशिक्षण - ४ कोटी ७१ लाखआरोग्य, पाणीपुरवठा - ३ कोटी २० लाखवन - १५ लाखसामान्य प्रशासन - ४ कोटी ८४ लाखबांधकाम - ४ कोटी ७१ लाखलघु पाटबंधारे - २० लाखवैद्यकीय - २ कोटी ३७ लाखकृषी - १ कोटी १३ लाखपशूसंवर्धन - ३ कोटी ७ लाखसंकीर्ण - ४ कोटी ४७ लाख

१७ कोटी ८४ लाखांची शिल्लक...जिल्हा परिषदेचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प हा १७ कोटी ८४ लाख रुपयांच्या शिलकीचा आहे. सध्या जिल्हा परिषदेकडे ३९ कोटी ५० लाख शिल्लक असून आगामी वर्षभरात १६ कोटी १२ लाख रुपये जमा होणार आहे. त्याआधारे ५५ कोटी ६२ लाख रुपये जमेचा हा अर्थसंकल्प आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण...ग्रामीण भागातील विशेषत: मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक संगणक शिक्षण व प्रशिक्षण मिळावे म्हणून विशेष लक्ष केेंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी ४० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून एमएससीआयटी, टॅली, ॲडव्हान्स एक्सेल, इंग्रजी कम्युनिकेशनचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

एकल महिलांसाठी विशेष तरतूद...जिल्ह्यातील महिलांचे जीवनमान उंचाविण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित अशा एकल महिलांच्या प्रगतीसाठी २० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून एकल महिलांसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहेत.

देशी गोवंशाचे संवर्धन...देशी गोवंशाचे संवर्धनासाठी ५ लाखांची तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी ८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र नागणे यांनी दिली.

दर्जा उंचावण्यावर भर ग्रामीण विद्यार्थी, एकल महिला, शेतीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच आरोग्य, शिक्षणाचा दर्जा आणखीन उंचावण्यावर भर आहे.- राहुलकुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur ZP Budget: AI Education & English Skills for Rural Students

Web Summary : Latur Zilla Parishad's budget prioritizes rural student development with AI education and English communication skills. Funds are allocated for marginalized student computer training and initiatives for single women's empowerment, alongside agriculture and healthcare improvements. Budget surplus is ₹17.84 million.
टॅग्स :Latur z pलातूर जिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्र