खेड्यातील मुले शिकणार AI; इंग्रजीत साधणार संवाद! लातूर झेडपीच्या अर्थसंकल्पात खास तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 19:34 IST2026-03-18T19:31:51+5:302026-03-18T19:34:19+5:30

जिल्हा परिषदेचा ३७ कोटी ७८ लाखांचा अर्थसंकल्प मंजूर

Latur Zilla Parishad Budget 2026-27: ₹37.78 Crore Allocated; Rural Students to Learn AI & English Communication | खेड्यातील मुले शिकणार AI; इंग्रजीत साधणार संवाद! लातूर झेडपीच्या अर्थसंकल्पात खास तरतूद

खेड्यातील मुले शिकणार AI; इंग्रजीत साधणार संवाद! लातूर झेडपीच्या अर्थसंकल्पात खास तरतूद

लातूर : आजच्या एआयच्या दुनियेत खेड्यातील मुलेही आघाडीवर रहावीत तसेच एकल महिलांचे जीवनमान उंचावे म्हणून जिल्हा परिषदेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी विशेष तरतूद आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकात केली आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचा प्रगतीला आणखीन चालना मिळणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक राहुलकुमार मीना यांच्यासमोर प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र नागणे यांनी जिल्हा परिषदेचा सन २०२६- २७ चा ५५ कोटी ६२ लाख ८३ हजार १३३ रुपयांच्या जमेचा आणि ३७ कोटी ७८ लाख ६१ हजार रुपये खर्चाचा अर्थसंकल्प गुरुवारी सादर केला. तो प्रशासक राहुलकुमार मीना यांनी मंजूर केला.

कोणत्या विभागांसाठी किती रुपयांची तरतूद...
विभाग - रक्कम
समाजकल्याण - २ कोटी १९ लाख
दिव्यांग कल्याण - २ कोटी ४२ लाख
महिला व बालकल्याण - १ कोटी ६६ लाख
शिक्षण - ४ कोटी ७१ लाख
आरोग्य, पाणीपुरवठा - ३ कोटी २० लाख
वन - १५ लाख
सामान्य प्रशासन - ४ कोटी ८४ लाख
बांधकाम - ४ कोटी ७१ लाख
लघु पाटबंधारे - २० लाख
वैद्यकीय - २ कोटी ३७ लाख
कृषी - १ कोटी १३ लाख
पशूसंवर्धन - ३ कोटी ७ लाख
संकीर्ण - ४ कोटी ४७ लाख

१७ कोटी ८४ लाखांची शिल्लक...
जिल्हा परिषदेचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प हा १७ कोटी ८४ लाख रुपयांच्या शिलकीचा आहे. सध्या जिल्हा परिषदेकडे ३९ कोटी ५० लाख शिल्लक असून आगामी वर्षभरात १६ कोटी १२ लाख रुपये जमा होणार आहे. त्याआधारे ५५ कोटी ६२ लाख रुपये जमेचा हा अर्थसंकल्प आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण...
ग्रामीण भागातील विशेषत: मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक संगणक शिक्षण व प्रशिक्षण मिळावे म्हणून विशेष लक्ष केेंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी ४० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून एमएससीआयटी, टॅली, ॲडव्हान्स एक्सेल, इंग्रजी कम्युनिकेशनचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

एकल महिलांसाठी विशेष तरतूद...
जिल्ह्यातील महिलांचे जीवनमान उंचाविण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित अशा एकल महिलांच्या प्रगतीसाठी २० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून एकल महिलांसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहेत.

देशी गोवंशाचे संवर्धन...
देशी गोवंशाचे संवर्धनासाठी ५ लाखांची तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी ८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र नागणे यांनी दिली.

दर्जा उंचावण्यावर भर 
ग्रामीण विद्यार्थी, एकल महिला, शेतीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच आरोग्य, शिक्षणाचा दर्जा आणखीन उंचावण्यावर भर आहे.
- राहुलकुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी.

Web Title : लातूर जेडपी बजट: ग्रामीण छात्रों के लिए एआई शिक्षा और अंग्रेजी कौशल

Web Summary : लातूर जिला परिषद का बजट ग्रामीण छात्रों के विकास को प्राथमिकता देता है, जिसमें एआई शिक्षा और अंग्रेजी संचार कौशल शामिल हैं। सीमांत छात्र कंप्यूटर प्रशिक्षण और एकल महिलाओं के सशक्तिकरण के लिए पहल के साथ-साथ कृषि और स्वास्थ्य सेवा में सुधार के लिए धन आवंटित किया गया है। बजट अधिशेष ₹17.84 मिलियन है।

Web Title : Latur ZP Budget: AI Education & English Skills for Rural Students

Web Summary : Latur Zilla Parishad's budget prioritizes rural student development with AI education and English communication skills. Funds are allocated for marginalized student computer training and initiatives for single women's empowerment, alongside agriculture and healthcare improvements. Budget surplus is ₹17.84 million.