लातूर: ट्रॅव्हल्स बसचा उदगीरकडे जाताना पहाटेच्या वेळी अपघात, दोन ठार, ३४ जण जखमी

By आशपाक पठाण | Updated: May 29, 2025 10:00 IST2025-05-29T09:59:05+5:302025-05-29T10:00:02+5:30

एकूण जखमींपैकी ८ जणांची प्रकृती गंभीर

Latur Travels bus on its way to Udgir met with an accident in the early hours of the morning bus cleaner killed 34 injured | लातूर: ट्रॅव्हल्स बसचा उदगीरकडे जाताना पहाटेच्या वेळी अपघात, दोन ठार, ३४ जण जखमी

लातूर: ट्रॅव्हल्स बसचा उदगीरकडे जाताना पहाटेच्या वेळी अपघात, दोन ठार, ३४ जण जखमी

आशपाक पठाण, उजनी (जि. लातूर): पुणे ते उदगीर जाणाऱ्या कृष्णा व अभिनव ट्रॅव्हल्सचा गुरूवारी पहाटे पाच वाजता उदगीरकडे जात असताना औसा तालुक्यातील उजनी पासून एक किलो मिटर अंतरावर अपघात झाला. या घटनेत दोन जण ठार तर ३४ जण जखमी आहे. त्यात ८ जणांची प्रकृती गंभीर आहे.

तुळजापूर ते लातूर महामार्गावर उजनी नजीक गुरुवारी पहाटे एकता बियर बार जवळ उदगीरकडे निघालेल्या कृष्णा ट्रॅव्हल्स क्रमांक AR 01 Y 3555 या गाडीला पाठीमागून आलेली अभिनव ट्रॅव्हल्स MH 24 W 1212 या गाडीने जोराची धडक दिली. यात कृष्णा ट्रॅव्हल्सची बस जागीच पलटी होऊन त्यात ३४ प्रवासी जखमी झाले आहेत. तर अभिनव ट्रॅव्हल्सचा क्लिनर नामदेव व्यंकटराव सूर्यवंशी (वय ४०, रा अळवाई. ता भालकी. जि बीदर) हा जागीच ठार झाला.

या घटनेची माहिती मिळताच लातूर येथील पोलीस महामार्गचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय भोसले, योगीराज नागरगोजे व भादा पोलिस निरीक्षक महावीर जाधव, रतन मोरे, अनंत कांबळे, माऊली फड, अनंत शिंदे यांनी धाव घेतली. तसेच उजनी येथील हॉटेल चालक व कामगारांना मदतीसाठी बोलवण्यात आले. मयत नामदेव व्यंकटराव सूर्यवंशी यांचे पार्थिव उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहे.

Web Title: Latur Travels bus on its way to Udgir met with an accident in the early hours of the morning bus cleaner killed 34 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.