Latur: चाेरट्या मार्गाने वाळूची वाहतूक; ट्रॅक्टरसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, नळेगावाची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 22:18 IST2023-03-26T22:16:45+5:302023-03-26T22:18:30+5:30

Latur: लातूर जिल्ह्यातील नळेगाव येथे चाेरट्या मार्गाने अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या एकाला वाहनासह ताब्यात घेतले आहे. यावेळी ट्रॅक्टरसह वाळू असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Latur: Transportation of sand by road; 5 lakh worth of goods seized including a tractor, Nalegaon incident | Latur: चाेरट्या मार्गाने वाळूची वाहतूक; ट्रॅक्टरसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, नळेगावाची घटना

Latur: चाेरट्या मार्गाने वाळूची वाहतूक; ट्रॅक्टरसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, नळेगावाची घटना

- राजकुमार जाेंधळे
लातूर - जिल्ह्यातील नळेगाव येथे चाेरट्या मार्गाने अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या एकाला वाहनासह ताब्यात घेतले आहे. यावेळी ट्रॅक्टरसह वाळू असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, चाकूर येथील ठाण्याचे पाेलिस निरीक्षक बालाजी महादू माेहिते (वय ५२) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे बसस्थानकासमाेरील शिरूर अनंतपाळ राेडवर एका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून चाेरट्या मार्गाने अवैध वाळूची वाहतूक केली जात हाेती. दरम्यान, याची माहिती चाकूर ठाण्याच्या पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी नळेगाव येथील बसस्थानकासमाेरून निळसर रंगाच्या ट्रॅक्टरची झाडाझडती घेतली असता, पाेलिसांना पाहून चालक निघून गेला. यावेळी घटनास्थळावरून पाेलिसांनी वाळूसह ट्रॅक्टर असा पाच लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात ट्रॅक्टरचालकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Latur: Transportation of sand by road; 5 lakh worth of goods seized including a tractor, Nalegaon incident