Latur: खरेदीचा ‘सुवर्ण’याेग..! साेन्या-चांदीच्या खरेदीसाठी गर्दी, काेट्यवधींची उलाढाल
By राजकुमार जोंधळे | Updated: October 12, 2024 21:24 IST2024-10-12T21:23:46+5:302024-10-12T21:24:12+5:30
Latur: साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर लातूरसह अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि औसा येथील सराफा बाजारात दिवसभरात काेट्यवधींची उलाढाल झाली. अनेकांनी खरेदीचा सुवर्णयाेग साधत ‘सीमाेल्लंघन’ केले.

Latur: खरेदीचा ‘सुवर्ण’याेग..! साेन्या-चांदीच्या खरेदीसाठी गर्दी, काेट्यवधींची उलाढाल
- राजकुमार जाेंधळे
लातूर - साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर लातूरसह अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि औसा येथील सराफा बाजारात दिवसभरात काेट्यवधींची उलाढाल झाली. अनेकांनी खरेदीचा सुवर्णयाेग साधत ‘सीमाेल्लंघन’ केले.
सराफा बाजारात साेन्या-चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली. अनेकांनी विजयादशमीला ‘साेन्या’ची लूट केली. परिणामी, जिल्ह्यातील सराफा बाजारात काेट्यवधींची उलाढाल झाली. इकडे वाहन आणि रिअल इस्टेट क्षेत्रातही खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. अनेकांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर स्वप्नातील घर घेण्याचे स्वप्न साकार केले.
वर्षभरात साेन्या-चांदीत २० हजारांची झाली वाढ
गत वर्षभरात साेन्या-चांदीच्या दरात माेठी तेजी आहे. जवळपास १५ ते २० हजार रुपयांनी दर वधारले आहेत. शनिवारी साेने प्रतिताेळा ७६ हजार ५०० रुपयांवर (जीएसटीसह ७८ हजार ८०० रुपये) पाेहचले हाेते. चांदी प्रति किलाे ९३ हजार ६०० रुपयांवर (जीएसटीसह ९४ हजार २०० रुपये) पाेहचले हाेते.
दुपारनंतर लातूर सराफा बाजारात खरेदीचा उत्साह
दुपारी १२ नंतर सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली अन् ८० हजारांच्या घरात पाेहचलेल्या साेन्याचा खरेदीचा उत्साह ग्राहकांच्या चेहऱ्यावर कायम असल्याचे दिसून आले. दिवसभरात साेन्या-चांदीच्या खरेदीतून सराफा बाजाराने काेट्यवधींचे ‘सीमाेल्लंघन’ केले.
वाहन बाजारात तेजी...रिअल इस्टेटही जाेरात
विजयादशमीच्या मुहूर्तावर वाहन बाजारात माेठी तेजी हाेती. अनेकांनी वाहनांची खरेदी करून घरी नेले आणि विधिवत पूजन केले. बांधकाम क्षेत्रात अनेकांनी आपल्या स्वप्नातील घरांचे बुकिंग, खरेदी करून सुवर्णयाेग साधला.
त्याचबराेबर काहींनी प्लाॅट, राे-हाऊस, फ्लॅट खरेदीला प्राधान्य दिले. काहींनी विजयादशमीच्या मुहूर्तावर नव्या घरात पाऊल ठेवले. गत पाच वर्षात साेन्या-चांदीच्या दरात माेठी दरवाढ झाली आहे, तर रिअल इस्टेटमधील मालमत्तांचे दरही दुपटीवर पाेहचले आहेत.
असे वाढले साेन्याचे दर
वर्ष --------------- साेने प्रतिताेळा
२०१९ ------------- ३५,०००
२०२० ------------- ४८,६००
२०२१ ------------- ४९,१३०
२०२२ ------------- ५१,८६०
२०२३ ------------- ६१,२००
२०२४ ------------- ७९,०००