Latur: भरधाव कार उलटली; हैदराबादचा तरुण ठार, उदगीर-बिदर मार्गावर अपघात
By राजकुमार जोंधळे | Updated: May 25, 2024 23:25 IST2024-05-25T23:24:51+5:302024-05-25T23:25:04+5:30
Latur Accident News: भरधाव कार उलटल्याने हैदराबाद येथील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उदगीर ते बीदर महामार्गावर बामणी पाटीनजीक शनिवारी घडली. याबाबत रात्री उशिरापर्यंत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Latur: भरधाव कार उलटली; हैदराबादचा तरुण ठार, उदगीर-बिदर मार्गावर अपघात
- राजकुमार जाेंधळे
उदगीर (जि. लातूर) - भरधाव कार उलटल्याने हैदराबाद येथील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उदगीर ते बीदर महामार्गावर बामणी पाटीनजीक शनिवारी घडली. याबाबत रात्री उशिरापर्यंत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील बामणी पाटीनजीक शनिवारी भरधाव कार (ए.पी. ०९ बी.ओ. ०२८९) उलटली. या अपघातात मुमताज अलिखान (वय ४०, रा. हैद्राबाद) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याचे जमादार व्यंकट धुळशेट्टे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करुन, तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उदगीर येथील रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाद्ब अशी माहिती उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दिली. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.