लातुरात शनिवारी ५१ पॉझिटिव्ह; सारीच्या आजाराने दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 17:32 IST2020-07-18T17:32:01+5:302020-07-18T17:32:42+5:30

जिल्ह्यात बाधितांची संख्या आता १०४४ वर पोहोचली आहे. 

Latur on Saturday 51 positive; two died of Sari's disease | लातुरात शनिवारी ५१ पॉझिटिव्ह; सारीच्या आजाराने दोघांचा मृत्यू

लातुरात शनिवारी ५१ पॉझिटिव्ह; सारीच्या आजाराने दोघांचा मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यात शनिवारी ५१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी ४७२ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील १५५ जणांचा अहवाल प्रलंबित आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या आता १०४४ वर पोहोचली आहे. 

दरम्यान, शनिवारी उदगीर येथे सारीची लक्षणे असलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कोरोनाचे उपचार घेत असलेल्या एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने मृत्यूची संख्या ४८ झाली आहे.

जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्या २३ जणांनी कोरोनावर मात केली असून, प्रकृती ठणठणीत झालेल्या या रुग्णांना शनिवारी सुटी देण्यात आली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी सांगितले.

Web Title: Latur on Saturday 51 positive; two died of Sari's disease