शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

लातूर आरटीओच्या घरपोच सेवेचा उडाला बोजवारा; वाहनधारकांची सोय कमी मनस्तापच जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 19:01 IST

लातुर आरटीओच्या 'घरपोच सेवे'ने सोय कमी मनस्तापच जास्त 

ठळक मुद्देआरसी बुक, वाहन परवान्यासाठी वाहनधारकांचे खेटेवर्षभरात ७०० आरसीबुक परत 

- आशपाक पठाण

लातूर : प्रादेशिक परिहवन विभागाने सर्वच सेवा ऑनलाईन केल्या आहेत़ गेल्या काही वर्षांपासून वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र असो की वाहन परवाना अशी बहुतांश कागदपत्रे घरपोच दिली जात आहेत़ मात्र,  या घरपोच सेवेमुळे हजारो वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़ शिवाय, सर्वच वाहनांचे आरसी बुक (वाहनांचे नोंदणी पत्र) सहा सहा महिने मिळत नसल्याची ओरड आहे़ वर्षभरात ७०० जणांचे पत्र परत आली आहेत़

वाहनांची नोंदणी केल्यावर किमान आठ ते दहा दिवसांत संबंधित मालकांना नोंदणी प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे़ शासनाने वाहन परवाना, वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र घरपोच देण्याची योजना सुरू करून संबंधितांचे कार्यालयातील खेटे कमी करण्याचा प्रयत्न केला़  मात्र, मागील वर्षभरापासून घरपोच सेवेचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ नागरिकांना घरपोच कागदपत्रे देण्यासाठी ५० रुपए शुल्क घेतला जातो़ लायसन्स किंवा आरसी बुक तयार झाल्यावर आरटीओ कार्यालयातून  पोस्टाकडे पाठविले जाते़ तद्नंतर त्याचा प्रवास सुरू झाला की जवळपास ८० ते ९० किलोमीटरच्या वर्तुळात संबंधित मालकाच्या घरी कागदपत्रे जायला चार चार महिने लागत आहेत़ वाहन परवान्याचा प्रवासही दोन महिन्यांपेक्षा कमी होत नसल्याने अनेकांना घरपोच सेवेचा मनस्ताप सहन करावा लागत आहे़ दुचाकी, आॅटोरिक्षा, कार, अन्य व्यावसायिक वाहनधारकांना वेळेत कागदपत्रे मिळत नसल्याने व्यवसायात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे वाहनधारकांनी सांगितले़ आरटीओ कार्यालय परिसरात ड्रायव्हिंग स्कुल चालकांसोबतही वादाच्या घटना नेहमीच होत आहेत़ त्यामुळे घरपोच सेवेपेक्षा जुनीच पध्दत बरी होती, अशी म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे़ 

हाय सेक्युरिटी ‘प्लेट’मुळे डोकेदुखी़नवीन वाहनांची नोंदणी झाल्यावर सदरील वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसविल्या जात आहेत़ यासाठी वाहन खरेदी करतानाच त्या प्लेटचे पैसे डिलरकडून भरून घेतले जातात़ मात्र, एकदा वाहनांची पासिंग झाली की वाहन मालकांना आरसी बुकसाठी आरटीओ कार्यालय तर नंबर प्लेटसाठी डिलरच्या दारात खेटे मारावे लागतात़  यातून नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ याकडे कारवाई करणार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे़ 

नंबरप्लेट घेतल्यावर होते नोंदणीहाय सेक्युरिटी नंबरप्लेटमुळे वेळ लागत आहे़ वाहनांची पासिंग झाली की नंबर दिला जातो़ जोपर्यंत संबंधित वाहनमालक नंबरप्लेट घेऊन जाणार नाही, तोपर्यंत आॅनलाईन नोंद पूर्ण होत नाही़ आमच्याकडे आरसी बुक तयार करून पोस्टाने पाठविले जातात़ शहरी भागातील वाहनधारकांना ते लवकर मिळतात़ मात्र, ग्रामीण भागात पोस्टामुळे वेळ जातो़ घरचा पत्ता व्यवस्थित नसल्याने  ज्यांचे आरसीबुक, लायसन्स परत आले त्यांना ५० रुपए शुल्क भरून घेऊन कार्यालयात हातात दिले आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले़

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसlaturलातूरbikeबाईक