लातूर : महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरण धोरणांतर्गत लातूर जिल्हा पोलिस दलाच्या तपास यंत्रणेला मोठी बळकटी मिळाली आहे. गुन्ह्यांचा तपास अधिक वेगवान, वैज्ञानिक आणि अचूक करण्यासाठी लातूर पोलिस दलात आणखी चार नव्या आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन शुक्रवारी दाखल झाल्या आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
लातूर पोलिस दलाकडे पूर्वी तीन फॉरेन्सिक व्हॅन कार्यरत हाेत्या. आता या चार नवीन व्हॅनमुळे एकूण संख्या सातवर पोहोचली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही दुर्गम भागात अथवा शहरात गुन्हा घडल्यास, फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी तातडीने पोहोचणे शक्य होणार आहे.
फॉरेन्सिक व्हॅनची वैशिष्ट्ये, कार्यप्रणाली...या आधुनिक व्हॅन केवळ वाहने नसून चालते-फिरते तपास केंद्र आहेत.१) वैज्ञानिक पुरावे संकलन : घटनास्थळावरील बोटांचे ठसे, रक्ताचे नमुने, शस्त्रांचे अवशेष आणि इतर भौतिक पुरावे शास्त्रीय पद्धतीने गोळा करणे.२) सुरक्षित जतन : गोळा केलेले सूक्ष्म पुरावे दूषित होऊ नयेत यासाठी या व्हॅनमध्ये विशेष साठवणूक सुविधा उपलब्ध आहे.३) तात्काळ विश्लेषण : प्राथमिक तपासणीसाठी लागणारी आधुनिक उपकरणे व्हॅनमध्येच असल्याने तपासाला तात्काळ दिशा मिळते.४) पारदर्शकता : वैज्ञानिक पुराव्यांमुळे तपास प्रक्रिया अधिक अचूक आणि पारदर्शक होते.न्यायालयीन प्रक्रियेत होणार मोठा फायदा हाेणार आहे. पारंपारिक तपासासोबतच आधुनिक वैज्ञानिक पद्धतींचा वापर केल्यामुळे न्यायालयात सादर केले जाणारे पुरावे अधिक 'सबळ' ठरतात.५) वैज्ञानिक पुराव्यांची विश्वासार्हता : गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. निर्दोष व्यक्तींवर अन्याय होण्याची शक्यता कमी होईल. क्लिष्ट आणि गंभीर गुन्ह्यांची उकल कमी वेळेत होईल.
पाेलिस दल सक्षम हाेईल...‘कोणताही गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही,’ या ब्रीदवाक्याला अनुसरून लातूर पोलिस दल आता अधिक सक्षम झाले आहे. तंत्रज्ञानाच्या या वापरामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे अधिक सोपे होणार आहे. - अमाेल तांबे, पाेलिस अधीक्षक, लातूर
Web Summary : Latur police enhance crime investigation with four new, advanced forensic vans. Equipped with modern technology for evidence collection and analysis, these mobile labs will expedite investigations, improve accuracy, and strengthen court evidence, ensuring justice and reducing wrongful convictions.
Web Summary : लातूर पुलिस ने चार नई, उन्नत फोरेंसिक वैन के साथ अपराध जांच बढ़ाई। सबूत संग्रह और विश्लेषण के लिए आधुनिक तकनीक से लैस, ये मोबाइल प्रयोगशालाएं जांच में तेजी लाएंगी, सटीकता में सुधार करेंगी, और अदालती सबूतों को मजबूत करेंगी, जिससे न्याय सुनिश्चित होगा।