शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

लातूर-निलंगा महामार्ग ठरताेय मृत्यूचा सापळा! वर्षभरात ६२५ अपघात; ३०५ ठार तर २५५ जण गंभीर जखमी

By राजकुमार जोंधळे | Updated: March 27, 2023 20:47 IST

जिल्ह्यात लातूर-औसा, औसा-निलंगा-औराद शहाजानी, लातूर-नांदेड, शिरूर ताजबंद-निजामाबाद, लातूर-अंबाजाेगाई महामार्गावर हे अपघात झाले आहेत. यात अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

लातूर : जिल्ह्यात वर्षभरात विविध मार्गावर ६२५ अपघात झाले आहेत. यात ३०५ जणांचा बळी गेला असून, २५५ जण जखमी झाले आहेत. दिवसेंदिवस अपघात आणि मृतांच्या संख्येचा आलेख वाढत आहे. जिल्ह्यात लातूर-औसा, औसा-निलंगा-औराद शहाजानी, लातूर-नांदेड, शिरूर ताजबंद-निजामाबाद, लातूर-अंबाजाेगाई महामार्गावर हे अपघात झाले आहेत. यात अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

एकाच आठवड्यात लातूर-निलंगा-औराद शहाजानी महामार्गावर माेठे दाेन अपघात झाले. यात तब्बल ८ जण ठार झाले आहेत. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे अपघात झाल्याचे प्राथमिक चाैकशीत समाेर आले आहे. लातूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या नव्या महामार्गावर आता अपघाताच्या घटना माेठ्या प्रमाणावर घडत आहेत. महामार्ग आणि रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे वाहनांचा वेगही अमर्याद झाला आहे. अनेक वाहनचालकांच्या जिवावर हयगय अन् निष्काळजीपणा बेतला आहे. लातूर जिल्ह्यात काही भागात रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही भागांत दुरुस्ती केली आहे. परिणामी, वाहनांचा वेग वाढला आहे. सर्वाधिक वाहन अपघात दुचाकी, चारचाकी कार, जीपचे झाले आहेत.

वाहनांचा अमर्याद वेग नडला; अपघातात नाहक जीव गेला! -भरधाव वाहन चालवणे, नशेत वाहन चालवणे, वाहनावरचा ताबा सुटणे, ओव्हरटेक करणे अशा अनेक कारणांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. २०२१ मधील अपघाताची आकडेवारी, त्यातील मृत्यूची संख्या चिंताजनक आहे. ज्येष्ठांपेक्षा तरुणांची संख्याच यामध्ये अधिक आहे. ‘वाहनांचा अमर्याद वेग अनेकांना नडला अन् अपघातात नाहक जीव गेला...’ अशी स्थिती अपघातग्रस्तांची आहे.

अख्खे कुटुंबच झाले उद्ध्वस्त... -गत वर्षभरात झालेल्या अपघातात काहींचे अख्खे कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. जिल्ह्यात एकूण ६२५ अपघातात ३०५ ठार, तर २५५ गंभीर जमखी झाले आहेत. या अपघाताने अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अनेकांचे अख्खे कुटुंबच संपले आहे.

वाहन चालविताना अशी घ्या काळजी... -१) वाहतूक नियमांचे पालन करावे.२) वेगमर्यादेचे उल्लंघन करु नका.३) वाहन चालविताना सीटबेल्ट लावा.४) शक्यताे माेबाइलवर बाेलू नका.५) सतत वेगावर नियंत्रण ठेवावे.६) मद्यप्राशन करून गाडी चालवू नका.

आरटीओच्या पाहणीत आढळले २७ ब्लॅक स्पाॅट... -लातूरच्या आरटीओ विभागाने केलेल्या पाहणीत जिल्ह्यात राज्य आणि महामार्गावर एकूण २७ ब्लॅक स्पाॅट आढळून आले आहेत. याठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडल्या आहेत. ते ब्लॅक स्पाॅट दूर करण्यासाठी सार्वजिनक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. हे ब्लॅक स्पाॅट दूर झाले तर अपघाताच्या घटनांत घट होतील.   - आशुताेष बारकूल, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, लातूर

अन् आकडे बाेलतात... २०२२ मध्ये झालेले अपघात... -

प्रकार               अपघात        मृत्यू

पादचारी              १४२           ६६दुचाकी                ३३३          १६२ऑटाेरिक्षा             २१           १३कार                    ११७          ५२ट्रक                     १२            १२सायकल               ००            ००एकूण                  ६२५          ३०५ 

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर