लातूर: शेतात केली गांजाची लागवड; ६ लाख १० हजारांचा माल जप्त, दोघांना अटक
By राजकुमार जोंधळे | Updated: May 22, 2025 00:13 IST2025-05-22T00:11:37+5:302025-05-22T00:13:05+5:30
६१ किलो वजनाची गांजा, २८ झाडे असा एकूण ६ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लातूर: शेतात केली गांजाची लागवड; ६ लाख १० हजारांचा माल जप्त, दोघांना अटक
- राजकुमार जोंधळे, लातूर
जिल्ह्यातील तोगरी (ता. उदगीर) शिवारात गांजाची लागवड करणाऱ्या दोघांना अटक केली असून, ६१ किलो गांजाच्या २८ झाडांसह ६ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत देवणी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलिसांनी सांगितले, देवणी तालुक्यातील तोगरी शिवरात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कारवाईचे आदेश दिले. या आदेशानंतर देवणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्या पथकाने तोगरी शिवारातील गंगाराम हाकू चव्हाण यांच्या शेतात छापा मारला.
यावेळी ६१ किलो वजनाची गांजा, २८ झाडे असा एकूण ६ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत देवणी पोलीस ठाण्यात शेतमालक गंगाराम हाकू चव्हाण आणि संतोष गंगाराम चव्हाण (दोघेही रा. तोगरी, ता. उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांनाही अटक केली असून, तपास पोलीस उपनिरीक्षक वऱ्हाडे हे करीत आहेत.
ही कारवाई देवणीचे सपोनि. माणिक डोके, पोउपनि. गोंड, पोउपनि. वऱ्हाडे, पोउपनि. डफडवाड, पोलिस अंमलदार कोंडामंगले, कलवले, गुणाले, डोईजोडे, कुरे, शटकार, बिरादार यांच्या पथकाने केली.