शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
4
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
9
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
10
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
11
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
12
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
13
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
14
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
15
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
16
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
17
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
18
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
19
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
20
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:46 IST

समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थिनीच्या कुटुंबाला चार लाख रुपयांचे साहाय्य मंजूर

लातूर : येथील जवाहर नवोदय विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणामध्ये पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही गतीने केली. या प्रकरणात प्राप्त तक्रारीनंतर पोलिसांकडून पारदर्शक तपास सुरू करण्यात आला. या तपासाच्या आधारे विद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे दोन्ही कर्मचारी सध्या कोठडीत आहेत. तसेच विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना समाज कल्याण विभागामार्फत ४ लाख रुपयांचे साहाय्य मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून विद्यालयामध्ये समुपदेशक नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकरण गांभीर्याने हाताळले जात आहे. या दुःखद घटनेत मुलीच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत म्हणून समाज कल्याण विभागामार्फत ४ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे, पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनीही जवाहर नवोदय विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थी, पालकांशी संवाद साधला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने अमलात आणण्याचे निर्देश जवाहर नवोदय प्रशासनाला दिले आहेत. विद्यार्थी सुरक्षिततेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय समितीच्या पुणे विभागीय सहायक आयुक्त पंकज जॅक्सन, प्राचार्य गणपती म्हस्के यांची बैठक घेऊन सूचना केल्या आहेत. यावेळी विद्यार्थ्यासाठी समुपदेशक नियुक्तीची कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पुरावे जमविण्यासाठी पथक स्थापन...जवाहर नवोदय विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यूबाबत तक्रार दाखल होताच पोलिसांनी कोणताही विलंब न करता तपासाची चक्रे तत्काळ फिरवली. प्राथमिक तपासात निष्पन्न झालेल्या पुराव्यांच्या आधारे दोन महिला कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. या अनुषंगाने जबाब नोंदविणे, पुरावे जमा करणे यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले. या अत्यंत संवेदनशील प्रकरणाची लातूर जिल्हा प्रशासन व लातूर पोलिसांनी तत्काळ दखल घेत, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, गुन्ह्यातील कोणताही दोषी सुटू नये, यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे. लातूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी समीर साळवे यांच्या विशेष पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Schoolgirl Death: Investigation Progress and Actions Taken So Far

Web Summary : Latur Jawahar Navodaya Vidyalaya's student death case sees swift action. Two staff arrested, family gets aid. Safety measures are implemented; counselor appointed. Investigation continues.
टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी