शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

लातूर जिल्ह्यात ३.५ लाख मुलांचे झाले गोवर-रुबेला लसीकरण; ७३ टक्के उद्दिष्ट झाले पूर्ण : जिल्हा आरोग्याधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:04 PM

डॉ. परगे म्हणाले, ग्रामीण भागात ७४.७५ टक्के तर शहरी भागात ७३.७९ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्दे७३ टक्के उद्दिष्ट पूर्ण जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. परगे यांचा ‘लोकमत’शी संवाद

लातूर : समज-गैरसमजाला छेद देत गोवर-रुबेला लसीकरण मोहीम अंतिम टप्प्यात आली असून, ग्रामीण भागात जवळपास उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ग्रामीण व शहरी भाग मिळून ४ लाख ३७ हजार ७८५ पैकी ३ लाख २३ हजार ५८ मुला-मुलींना लस दिली असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

डॉ. परगे म्हणाले, ग्रामीण भागात ७४.७५ टक्के तर शहरी भागात ७३.७९ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागात ३ लाख ५७ हजार ७१५ चे उद्दिष्ट होते. त्यापैकी २ लाख ६५ हजार २३२ मुला-मुलींना ही लस देण्यात आली आहे. याची टक्केवारी ७४.१५ टक्के आहे. तर शहरी भागामध्ये ८० हजार ७१ टक्के उद्दिष्ट होते. त्यापैकी ५७ हजार ८२६ लाभार्थ्यांना ही लस देण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ७२.२२ टक्के आहे. २७ नोव्हेंबरपासून ही मोहीम सुरू झाली असून, रविवार व शासकीय सुटी वगळता सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील शाळा ३१ डिसेंबर अखेर पूर्ण होतील. त्यानंतर राहिलेल्या मुला-मुलींना ही लस देण्यासाठी कार्यक्रम हाती घेणार असल्याचेही डॉ. परगे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सदर उद्दिष्ट प्राप्त केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत ७७ हजार ५०० मुला-मुलींना लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५९ हजार ८५८ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. त्याची टक्केवारी ७७.२३ टक्के आहे. तर जिल्ह्यामध्ये ४ लाख ९६ हजार ८८३ पैकी ३ लाख ६९ हजार ६१९ मुला-मुलींना लस देण्यात आली. त्याची टक्केवारी ७४.३९ साध्य झाली असल्याचेही ते म्हणाले. 

शाळा पूर्ण, अंगणवाड्या सुरू... ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेसह खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांना लस देण्यात येत असून, बहुतांश शाळांत फेरी पूर्ण झाली आहे. जे विद्यार्थी लस घेण्यापासून वंचित आहेत, त्यांना अंगणवाडीसाठी जाहीर केलेल्या कार्यक्रमात ही लस दिली जाईल. पालकांनी कुठलीही भीती न बाळगता आपल्या बालकांना लस टोचून घ्यावी, असे आवाहनही डॉ. परगे यांनी केले आहे.

टॅग्स :laturलातूरhospitalहॉस्पिटलStudentविद्यार्थी