Latur: जेवणाच्या कारणावरुन हाॅटेल मालकाच्या डाेक्यात बाटली घातली, दाेघांवर गुन्हा

By राजकुमार जोंधळे | Updated: October 27, 2023 21:35 IST2023-10-27T21:35:02+5:302023-10-27T21:35:29+5:30

Latur: जेवायला न दिल्याच्या कारणावरुन उदगीर येथील एका हॉटेल मालकाच्या डाेक्यात बिअरची बाटली घालत मारहाण करण्यात आल्याची घटना देगलूर राेडवर घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latur: Bottled in hotel owner's car over food, crime on drugs | Latur: जेवणाच्या कारणावरुन हाॅटेल मालकाच्या डाेक्यात बाटली घातली, दाेघांवर गुन्हा

Latur: जेवणाच्या कारणावरुन हाॅटेल मालकाच्या डाेक्यात बाटली घातली, दाेघांवर गुन्हा

- राजकुमार जाेंधळे
लातूर - जेवायला न दिल्याच्या कारणावरुन उदगीर येथील एका हॉटेल मालकाच्या डाेक्यात बिअरची बाटली घालत मारहाण करण्यात आल्याची घटना देगलूर राेडवर घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर येथील देगलूर रोडवर असलेल्या हॉटेल राजवाडा येथे गौतम किवंडे, राहुल कांबळे (रा. उदगीर) हे रात्री उशिरा गेले हाेते. दरम्यान, आम्हाला जेवायला द्या अशी मागणी हॉटेल मालक बाजीराव शंकरराव पाटाेदे यांच्याकडे केली. यावेळी मालकाने हॉटेल बंद झाल्याचे सांगितले. आता जेवण नाही, असे म्हणत असताना खिडकीच्या काचा फाेडल्या. त्याचबराेबर कम्प्युटरची तोडफोड केली. हॉटेल मालकाच्या डोक्यात बीअरची बाटली घालून गंभीर जखमी केले. शिवाय, ३० हजार रुपये घेऊन गेले. याबाबत हॉटेलमालकाने दिलेल्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Latur: Bottled in hotel owner's car over food, crime on drugs