Latur: तलावामध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
By राजकुमार जोंधळे | Updated: March 1, 2023 21:23 IST2023-03-01T21:22:40+5:302023-03-01T21:23:00+5:30
Latur: लातूर शहरानजीक असलेल्या वाकी तलावात ३५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह बुधवार, १ मार्च राेजी दुपारी ४:३० वाजता आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Latur: तलावामध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
- राजकुमार जाेंधळे
लातूर - शहरानजीक असलेल्या वाकी तलावात ३५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह बुधवार, १ मार्च राेजी दुपारी ४:३० वाजता आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पाेलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात घटनेची नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर शहरानजीक वाकी तलावातील पाण्यावर एका पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत पाेलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी अहमदपूर पाेलिसांनी धाव घेत मृतदेह तलावातून बाहेर काढला. मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून, ती पटविण्याचा प्रयत्न सध्या पाेलिस करीत आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात केले जाणार आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट हाेईल, असे पाेलिसांनी सांगितले.
ओळख पटविण्याचा प्रयत्न...
मयत ३५ वर्षीय व्यक्तीच्या चेहऱ्यावर जखम असल्याचे आढळून आले आहे. अंगात काळ्या रंगाची अंडरवेअर आहे. पाेलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिक माहितीसाठी अहमदपूर ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांनी केले आहे.