पंढरपूर आषाढी यात्रेला वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार लालपरी; लातूर विभागाच्या १०२ बसेस सज्ज
By हणमंत गायकवाड | Updated: May 17, 2023 14:28 IST2023-05-17T14:28:08+5:302023-05-17T14:28:33+5:30
लातूर विभागाच्या लातूर, निलंगा, उदगीर, औसा आणि अहमदपूर या पाच आगारातून पंढरपूर यात्रेसाठी बसेस सोडल्या जाणार आहेत.

पंढरपूर आषाढी यात्रेला वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार लालपरी; लातूर विभागाच्या १०२ बसेस सज्ज
लातूर:आषाढी एकादशीनिमित्त श्री शेत्र पंढरपूर यात्रेकरिता वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने लातूर विभागातून १०२ विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. २५ जून ते ५ जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. वारकऱ्यांच्या मागणीनुसार माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठीही विशेष बस सोडण्याचे नियोजन लातूर विभागाचे आहे.
लातूर विभागाच्या लातूर, निलंगा, उदगीर, औसा आणि अहमदपूर या पाच आगारातून पंढरपूर यात्रेसाठी बसेस सोडल्या जाणार आहेत. १०२ बसेसचा एक लाख ८५ हजार ५४० किलोमीटरचा प्रवास होणार आहे. त्यातून महामंडळाला ८९ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. शिवाय, वारकऱ्यांच्या मागणीनुसार गाडी सोडण्याचे नियोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आले आहे. पंढरपूर यात्रा आरामदायी आणि सुखरूप होण्यासाठी महामंडळाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती विभागीय निरीक्षक अभय देशमुख यांनी दिली. पाचवी आगारातून धावणार बसेस बार्शी-पंढरपूर, तुळजापूर-सोलापूर, निलंगा-सोलापूर -पंढरपूर, उदगीर-लातूर-सोलापूर-पंढरपूर या मार्गावरून वारकऱ्यांसाठी पंढरपूर यात्रा बसेस धावणार आहेत.
या बसेसच्या आगारनिहाय नियोजन करण्यात आले आहे. यात्रा बसला सवलतीच्या सर्वच योजना लागू.... यात्रा बसेसला सवलतीच्या सर्वच योजना लागू आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत योजना, महिलांसाठी सन्मान योजना, दिव्यांग व अपंगांसाठी सवलत योजनांसह ज्या म्हणून महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी योजना लागू केल्या आहेत. त्या सर्व योजना यात्रा बसलाही आहेत,अशी माहितीही विभागीय निरीक्षक देशमुख यांनी दिली.
८९ लाखांचे उत्पन्न अपेक्षित.... पंढरपूर यात्रेसाठी या १०२ बसेसचा एक लाख ८५ हजार ५४० किमी प्रवास होणार असून यातून ८९ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.