उदगीरात बॉडी मसाज सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 14:24 IST2024-10-03T14:24:19+5:302024-10-03T14:24:33+5:30
याप्रकरणी तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आली आहे.

उदगीरात बॉडी मसाज सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
उदगीर : देगलूर रोडवर एका पेट्रोलपंपाच्या बाजूला असलेल्या इमारतीमध्ये स्पा अँड बॉडी मसाज सेंटरच्या नावाखाली चालू असलेल्या कुंटनखान्यावर पोलीस अधीक्षकाच्या पथकाने छापा टाकून गुरुवारी पहाटे धाड टाकून कारवाई केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, देगलूर रोडवर असलेल्या पेट्रोलपंपाच्या बाजूला एका इमारतीमध्ये द बेला स्पा अँड बॉडी मसाज सेंटर आहे. मात्र, येथे बॉडी मसाजच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून लातूर येथील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी धाड टाकली. यावेळी महिलांना पैशाचे आमिष देऊन देह व्यापारास प्रवृत्त करीत असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी संपत भगवान खुणे, गोपाळ माने रा. लातूर व किरण संदिपान शिंदे ( रा. तांबवा ता. केज) या तिघाविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे कलम १४३, ३ (५) , बीएनएससह कलम ३, ४,, ५, ७ व्यापार प्रतिबंधित अधिनियम १९५६ अन्वये दहशतवाद विरोधी शाखा लातूरचे पोलीस उपनिरीक्षक आयूब गफूरसाहब शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. टर पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी करीत आहेत.