क्रांती मोर्चाचे राज्यातील पदाधिकारी लातुरात, रविवारी आंदोलनाची दिशा ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 21:15 IST2018-07-28T21:14:50+5:302018-07-28T21:15:30+5:30
मराठा क्रांती मोर्चाचे राज्यातील समन्वयक लातुरात दाखल झाले असून, रविवारी राज्य समन्वयकांची महत्त्वपूर्ण बैठक येथे होत आहे.

क्रांती मोर्चाचे राज्यातील पदाधिकारी लातुरात, रविवारी आंदोलनाची दिशा ठरणार
लातूर : मराठा क्रांती मोर्चाचे राज्यातील समन्वयक लातुरात दाखल झाले असून, रविवारी राज्य समन्वयकांची महत्त्वपूर्ण बैठक येथे होत आहे. याच बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले, मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, आंदोलनाचे राज्य समन्वयक यांच्या उपस्थितीत २९ जुलै रोजी लातूरमध्ये विचार मंथन होईल. बार्शी रोडवरील राहिचंद्र मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता या बैठकीला सुरुवात होईल. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या राज्यभर सुरू असलेले आंदोलन, शैक्षणिक सवलतींचा लाभ आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाबद्दल सरकारने घेतलेली भूमिका व अन्य मागण्यांबाबत या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे. बैठकीनंतर समन्वयक पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचेही सांगण्यात आले.