शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणाचे नाट्य आणि काँग्रेसला झटका! पोलीस बंदोबस्तात उमेदवार अंजना चौधरींची निवडणुकीतून माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 20:59 IST

लातूर जिल्हा परिषदेच्या तांबाळा गटातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या अंजना चौधरी यांनी माघार घेतली आहे. त्यांचे अपहरण झाले असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.

निलंगा (जि. लातूर) : जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तांबाळा जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस उमेदवार अंजना सुनील चौधरी यांचे अपहरण झाल्याची तक्रार २५ जानेवारी रोजी काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी पोलिसांत केली होती. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी अंजना चौधरी यांनी पोलिस बंदोबस्तात हजर राहत उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेस गोटात खळबळ उडाली.

काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या अंजना सुनील चौधरी यांचे अपहरण झाल्याची तक्रार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, ॲड. किरण जाधव यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे २५ जानेवारी रोजी केली होती. उमेदवारास शोधून समोर हजर करावे, अशी त्यांची मागणी होती. 

परंतु, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी म्हणजे २७ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास उमेदवार अंजना चौधरी पोलीस बंदोबस्तात निलंगा येथील निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी अर्ज परत घेतला.

भाजप विरुद्ध भाजप?

तांबाळा गटातून भाजपने महानंदा तुमकुटे यांना उमेदवारी दिली. तर भाजपकडूनच मीरा तुबाकले यांचाही अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु, नाट्यमयरीत्या काँग्रेस उमेदवाराने अचानक माघार घेतली असली तरी तुबाकले यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे तांबाळा गटाच्या मैदानात भाजप अधिकृत उमेदवार विरुद्ध भाजपकडूनच पर्यायी अर्ज दाखल केलेला उमेदवार अशी लढाई होणार आहे. 

पर्यायी उमेदवाराचा अर्ज मागे घेतला जाईल, अशी शक्यता होती; परंतु तो अर्ज कायम राहिल्याने बिनविरोध निघण्याचा भाजपचा इरादा फसला आहे. आता भाजपचाच असलेला पर्यायी उमेदवार अधिकृत उमेदवाराच्या विरोधात लढाईत उतरतो की तलवार म्यान करतो, हे प्रचारादरम्यान कळणार आहे. 

किंबहुना काँग्रेसकडून भाजप पर्यायी उमेदवाराला पाठबळ देऊन लढाईत रंगत आणली जाईल का, अशीही चर्चा सुरू आहे.

काँग्रेसला उमेदवार मिळाला नाही

अंजना सुनील चौधरी या भाजपच्याच आहेत. याउलट काँग्रेसला तांबाळा गटात उमेदवारच मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी अंजना चौधरी यांच्या अर्जाला दुपारी २:४७ वाजता शेवटच्या क्षणी एबी फॉर्म जोडला होता. मात्र, चौधरी यांची घरवापसी झाली असून, त्या आता भाजपासोबत प्रचारामध्ये आहेत.- अरविंद निलंगेकर, भाजप

भाजपचा बिनविरोधचा डाव फसला

सत्तेचा गैरवापर करून तांबाळा गटातील उमेदवारी माघारी घेतली गेली असली तरी बिनविरोधचा डाव फसला आहे. भाजप अधिकृत उमेदवाराला भाजपनेच उभा केलेला दुसरा उमेदवार आव्हान देणार आहे. आता त्या पर्यायी उमेदवाराला पाठबळ द्यायचे का? हा निर्णय वरिष्ठांसोबत चर्चा करून देऊ. -अभय साळुंके, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस 

English
हिंदी सारांश
Web Title : Kidnapping Drama: Congress Candidate Withdraws Amidst Police Protection in Nilanga

Web Summary : Congress candidate Anjana Choudhary withdrew her nomination in Nilanga amidst police protection after a reported kidnapping. This move upset Congress plans as a BJP candidate also remains in the race, spoiling a potential unopposed victory for the BJP. Internal BJP rivalry emerges.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Latur z pलातूर जिल्हा परिषदAmit Deshmukhअमित देशमुखBJPभाजपाPoliticsराजकारण