देवणीत एक्साईजचा छापा, हाॅटेलमधून कर्नाटकी दारूसाठा जप्त

By राजकुमार जोंधळे | Updated: March 10, 2023 19:31 IST2023-03-10T19:30:00+5:302023-03-10T19:31:49+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Karnatak liquor seized from hotel in Devani | देवणीत एक्साईजचा छापा, हाॅटेलमधून कर्नाटकी दारूसाठा जप्त

देवणीत एक्साईजचा छापा, हाॅटेलमधून कर्नाटकी दारूसाठा जप्त

लातूर : देवणी तालुक्यातील बाेराेळ येथे असलेल्या हाॅटेलवर उदगीर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी छापा मारला. यावेळी कर्नाटक राज्यात निर्मिती झालेल्या विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून, दाेघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ८१ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवणी तालुक्यातील बाेराेळ येथील हाॅटेल संदीप, हाॅटेल सह्याद्री येथे कर्नाटक राज्यात तयार झालेली दारूविक्री हाेत असल्याची माहिती उदगीर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे दाेन हाॅटेलवर पथकाने एकाच वेळी छापा मारला. यावेळी दाेन गुन्ह्यांमध्ये कर्नाटक राज्यात तयार झालेली विदेशी दारू, बिअरचा साठा असा एकूण ८१ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल हाती लागला आहे. ही कारवाई उदगीर विभागाचे निरीक्षक रमेश एम. चाटे, दुय्यम निरीक्षक स्वप्निल काळे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, जवान संताेष केंद्रे, हणमंत मुंडे, चालक विक्रम परळीकर यांच्या पथकाने केली.

Web Title: Karnatak liquor seized from hotel in Devani