रक्तदान मोहिमेत सहभागी व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST2021-06-25T04:15:45+5:302021-06-25T04:15:45+5:30

लातूर : ‘लोकमत’चे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर भव्य रक्तदान शिबिरे होत आहेत. त्याचाच एक भाग ...

Join the Blood Donation Campaign! | रक्तदान मोहिमेत सहभागी व्हा !

रक्तदान मोहिमेत सहभागी व्हा !

लातूर : ‘लोकमत’चे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर भव्य रक्तदान शिबिरे होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यात २ ते १५ जुलै दरम्यान ठिकठिकाणी शिबिरे होत असून, विविध संस्था व संघटनाही सहभाग नोंदवीत आहेत.

लातूरमध्ये २ जुलै रोजी लोकमत कार्यालय बी-३४ एमआयडीसी येथे सकाळी ११ वाजता शिबिराला प्रारंभ होईल. तसेच डॉक्टर्स डेचे औचित्य साधून लोकमत व आयएमएच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री हॉस्पिटल येथे सकाळी ११ ते २ या वेळेत रक्तदान शिबिर होणार असून, अधिकाधिक संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन आयएमए अध्यक्ष डॉ. सुरेखा काळे, सचिव डॉ. हनुमंत किनीकर यांनी केले आहे. तर ७ जुलै रोजी लोकमत व राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या वतीने रक्तदान शिबिर होणार असल्याचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी सांगितले. दरम्यान, १० जुलै रोजी लोकमत व वरद मेडिकल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने लहाने हॉस्पिटल येथे होणाऱ्या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांनी केले आहे.

लातूरसह उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा, रेणापूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, चाकूर तालुक्यांतही विविध संस्था आणि संघटना रक्तदानासाठी पुढे येत आहेत. लोकमतने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत २ ते १५ जुलै दरम्यान जिल्हाभरात मोठ्या स्तरावर शिबिरे होत आहेत.

कोरोना, लॉकडाऊनमुळे रक्ताचा तुटवडा

कोरोना, लॉकडाऊनमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. तो दूर करण्यासाठी लोकमतने पुढाकार घेऊन राज्यभर प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात शिबिरे आयोजिली आहेत. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेत सहभाग नोंदवून अधिकाधिक जणांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Join the Blood Donation Campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.