निलंबित वैद्यकीय अधिका-याची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:20 IST2021-05-09T04:20:34+5:302021-05-09T04:20:34+5:30
येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर पाटील यांनी उपचारासाठी दाखल रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना रुग्णालयात औषधी व इंजेक्शन ...

निलंबित वैद्यकीय अधिका-याची चौकशी
येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर पाटील यांनी उपचारासाठी दाखल रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना रुग्णालयात औषधी व इंजेक्शन उपलब्ध असताना खाजगी मेडिकलमधून औषधी घेण्यास सांगितले होते. रुग्ण व नातेवाइकांच्या तक्रारीवरून तहसीलदार गणेश जाधव यांनी मेडिकलवर धाड टाकून डॉ. पाटील यांच्या नावे असलेल्या औषधांच्या पावत्या जप्त केल्या होत्या. या प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिका-यांकडे पाठविण्यात आला होता. त्यावरून जिल्हा चिकित्सकांनी डॉ. पाटील यांना निलंबित केले होते.
दरम्यान, शनिवारी अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी व्हिडीओद्वारे ऑन रेकॉर्ड जबाब घेतला. सदरील अहवाल अद्याप गुप्त असून याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, डॉ. दिलीप सौंदाळे, तालुका आरोग्य मुख्याधिकारी डॉ. मल्लिकार्जुन पाटील उपस्थित होते. ही प्रक्रिया शांततेत पार पडल्याने नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी सर्वांचे आभार मानले.