कोविड केंद्रांच्या मदतीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:20 IST2021-05-09T04:20:01+5:302021-05-09T04:20:01+5:30
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा घेण्यात आली. कोरोनामुळे ही सभा अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन घेण्यात आली. यावेळी ...

कोविड केंद्रांच्या मदतीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्यांचा पुढाकार
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा घेण्यात आली. कोरोनामुळे ही सभा अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे, बांधकाम सभापती संगीताताई घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, जि.प. सदस्य संतोष वाघमारे, पृथ्वीराज शिवशिवे, धनंजय देशमुख, विमलताई पाटील आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.
कोविडच्या आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसह सर्व सदस्यांनी एक महिन्याचे मानधन कोविड केंद्राला मदत म्हणून देण्याचा ठराव अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी मांडला. त्यास सदस्य धनंजय देशमुख यांनी अनुमोदन दिले.
संबंधितांना दक्षतेच्या सूचना...
प्रारंभी अध्यक्ष केंद्रे यांनी कोरोनासंदर्भात आढावा घेतला. कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेला इंधनाची कमतरता भासणार नाही, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे, असे निर्देश दिले. तसेच कोरोना नियंत्रणासाठी लस हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेतील ज्या अधिकारी, कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते नागनाथअण्णा निडवदे यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.