लातूर : लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ३४२ मि. मी. पाऊस झाला असून, यंदाच्या पावसाळ्यात १२.३४२ दलघमी नवीन पाणीसाठा झाला आहे. सद्यस्थितीत प्रकल्पात ३९.५७४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून, एकूण पाणीसाठा ८६.७०४ दलघमी आहे. प्रकल्प क्षेत्रात पाऊस थांबल्याने पाण्याची आवकही बंद झाली आहे. मागील दोन दिवसात १.३७६ दलघमी आवक होती. रविवारी सकाळी आवक शून्यावर होती. प्रकल्पात एकूण साठा ८६.७०४ दलघमी असून, यातील ३९.५७४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. पाण्याची पातळी ६३७.८९ मीटर आहे. दि. १ जून २०२१पासून धरणात १२.३४२ दलघमी नवीन पाणी आले आहे. धरणाची क्षमता २२४.०९३ दलघमी असून, उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता १७६.९६३ दलघमी असून, तर मृतसाठा ८७.१३० दलघमी आहे. पाण्याची पूर्ण संचय पातळी ६४२.३७ मीटर असल्याची माहिती शाखा अभियंता शाहुराज पाटील यांनी दिली.
मांजरा प्रकल्पातील आवक थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:19 IST