शिरूर अनंतपाळ : येथील पंचायत समितीत सभापती डॉ. नरेश चलमले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सदस्य वर्षा भिक्का, सुमनताई गंभीरे, गटविकास अधिकारी नंदकुमार शेरखाने आदी उपस्थित होते.
येथील श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयात आयोजित कार्यक्रमाला सचिव डाॅ. बोपलकर, पंडित शिंदाळकर, त्र्यंबकप्पा आवाळे, काशिनाथ देवंगरे, शरद दुरुगकर, उजेडे गुरूजी, वैजनाथ संभाळे, डाॅ. शोभाताई बेंजरगे, पद्मा यरमलवार, ग्रंथपाल काशिनाथ बोडके, शिवनंदा चौंसष्टे, अनंत सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
तालुक्यातील अजनी (बु.) येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयात आयोजित कार्यक्रमाला काशिनाथ बोडके, नारायण सूर्यवंशी, निवृत्ती कांबळे, वामन शिंदे, अनिल अजनीकर, मारोती सूर्यवंशी, मल्हारी कांबळे, अमर शिंदे, विश्वनाथ बोडके, आनंद बोडके, ओमकार कांबळे उपस्थित होते.
येथील तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकारी शिवप्रसाद वलांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मंडल अधिकारी गाढवे उपस्थित होते.
येथील अनंतपाळ नूतन विद्यालयात प्राचार्य शिवाजीराव मादलापुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संस्थेचे सचिव प्रभाकरराव कुलकर्णी, अध्यक्ष नामदेवराव जगताप, कोषाध्यक्ष भारतराव कोंडेकर, काशिनाथ देवंगरे, संजीव पांचाळ, प्रा. रवी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
येथील नगर पंचायत कार्यालयात प्रभारी मुख्याधिकारी मंगेश शिंदे, तहसील कार्यालयात तहसीलदार अतुल जटाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी नायब तहसीलदार सुधीर बिरादार, आर. एन. पत्रिके, लेखाधिकारी नितीन बनसोडे, ओमप्रकाश चिल्ले यांची उपस्थिती होती.
तालुक्यातील दैठणा येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमाला मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, सरपंच योगेश बिरादार, उपसरपंच सीताराम पाटील, नितीन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक व्यंकटराव पाटील, प्रा. मनोहर सांगवे, प्रकाश पाटील, राजनारायण बिरादार, रमेश मुळे, विलास हासबे, बालाजी पारशेट्टे, परमेश्वर चामले, संदेश बोरूळकर, जमादार, अनिता गुर्ले आदी उपस्थित होते.