महात्मा बसवेश्वर प्राथमिक विद्यालयात कार्यक्रम
लातूर : येथील महात्मा बसवेश्वर प्राथमिक विद्यामंदिरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका मंगल याटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सुनिता पुरी, काशिनाथ मेहत्रे आदींसह शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. एमटीएस परीक्षेत प्रथम आलेल्या श्रीरंग आनेराव, स्वरूप नागापुरे यांचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
अहमदपूर येथे अभिवादन कार्यक्रम
अहमदपूर : लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त अहमदपूर तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सांब महाजन, तालुकाध्यक्ष ॲड. हेमंत पाटील, शहराध्यक्ष विकास महाजन, ओबीसीचे उप-जिल्हाध्यक्ष बंडू येरमे, अनु. जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रकाश ससाणे, वसंत शेटकर, काशिनाथ गाडवे, शिवाजीराव जंगापल्ले, दादासाहेब देशमुख, संदीप गुट्टे, राजू पुणे, सद्दाम पठाण, सद्दाम पटेल आदी उपस्थित होते.
शहर प्रमुखपदी रोकडोबा भुसाळे यांची निवड
किनगाव : येथील भारतीय जनता पार्टीच्या शहरप्रमुखपदी रोकडोबा शिवराज भुसाळे यांची निवड करण्यात आली. नियुक्तीपत्र खा. सुधाकर शृंगारे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिल्हा सरचिटणीस त्र्यंबक गुट्टे, तुकाराम गोरे, हणमंत देवकते यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शिवाजी बैंनगिरे, हेमंत गुट्टे, विठ्ठलराव बोडके, सुनील वाहुळे, चंद्रप्रकाश हंगे, रतन सौदागर, तुकाराम फड, शिवराज भुसाळे, माउली शृंगारे, अजय फड, विठ्ठल कांबळे, योगेश आंधळे, धनंजय चाटे, सुरेश आंधळे आदी उपस्थित होते.
बदने यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
किनगाव : अहमदपूर तालुक्यातील रूद्रा येथील रहिवासी युवराज भगवानराव बदणे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र चंदन पाटील नागराळकर यांच्या स्वाक्षरीने त्यांना देण्यात आले आहे. या निवडीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बदने यांनी सांगितले.