लातूर रोड येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक अनिल डावळे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी चंद्रशेखर मिरजकर, प्रभाकर कांबळे, श्रीधर म्हेत्रे, सुरेखा कापसे, शारदा अंतुरे-मिरजकर, शामल सोदले, जनार्धन घंटेवाड, विश्वनाथ नीला, मनोहर मेकले, अनुसया इंद्राळे, विजयालक्ष्मी स्वामी, हेमलता सुवर्णकार, मायावती येडले, छाया धुमाळ, सरपंच वसुंधरा मुंडे, माजी सरपंच मधुकरराव मुंडे, सिध्देश्वर अंकलकोटे, अंजुम शेख, बाबूराव चात्रे, श्रीहरी मुंडे, पा. मा. वाघमारे, रणजित मिरकले, शीतल मस्के, मुख्याध्यापक व्ही. व्ही. सरवदे उपस्थित होते.
लातूर रोड येथील ग्रामपंचायतीत मंगलबाई मुंडे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सरपंच वसुंधरा मुंडे, उपसरपंच अब्दुल शेख, माजी सरपंच मधुकरराव मुंडे, सिध्देश्वर अंकलकोटे, रेणुका पटणे, मैनाबाई भदाडे, अन्वरबी शेख, शीतल मस्के, रणजित मिरकले, राजेश्वर डुमणे, विलास देशमाने, नागनाथ कांबळे, पा. मा. वाघमारे, श्रीहरी मुंडे, पुंडलिक तेलंग, पाशामियाँ शेख, दुर्गेश मारापल्ले, शंकर साबणे, भारत चात्रे, दयानंद वाघमारे उपस्थित होते.
घरणी येथील ग्रामपंचायतीत सरपंच भानुदासराव पोटे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपसरपंच संपत मानुरे, सुधाकर पोटे, शिवाजी शिंदे, शिलरत्न सावते, मारोती यंचेवाड, ग्रामसेवक तातेराव खाडे, देविदास मानुरे, भरत पांचाळ, बालाजी आरगुडे, महारुद्र मुळे, सूर्यकांत पोटे, साहेबराव शिंदे आदी उपस्थित होते.
घरणी येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक माधवराव सोनटक्के यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी शिवहर स्वामी, प्रभावती पोतणे, प्रभावती मोतीपवळे, दिलीप मानखेडे, शिवकुमार मोरगे, किसन तळभोगे, बालाजी बेरकिळे, नीळंकठ भालेकर, रंजना नागुरे, सविता स्वामी, सुनीता नागरगोजे, रोहिणी बोडके, निवृत्ती मुंगे, सरपंच भानुदासराव पोटे, दिलीप पाटील आदींची उपस्थिती होती.