काैटुंबिक वाद विकाेपाला; जन्मदात्याकडून मुलाचा खून

By राजकुमार जोंधळे | Updated: September 8, 2023 19:17 IST2023-09-08T19:17:28+5:302023-09-08T19:17:33+5:30

याबाबत किल्लारी पाेलिस ठाण्यात वडिलाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

in Latur Murder of the child by the father | काैटुंबिक वाद विकाेपाला; जन्मदात्याकडून मुलाचा खून

काैटुंबिक वाद विकाेपाला; जन्मदात्याकडून मुलाचा खून

किल्लारी (जि. लातूर) : काैटुंबिक कारणातून झालेल्या भांडणामध्ये जन्मदात्याने आपल्या पाेटच्या मुलाला जबर मारहाण करुन, त्याचा खून केल्यची घटना औसा तालुक्यातील दावतपूर येथे घडली. याबाबत किल्लारी पाेलिस ठाण्यात वडिलाविराेधात शुक्रवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, दावतपूर येथे २ सप्टेंबरराेजी महादेव विनायक बिराजदार (वय ४८) याला वडील विनायक महादेव बिराजदार (वय ७८) या दाेघामध्ये रात्री ११ वाजण्याच्या सुमारास काैटुंबिक कारणातून कडाक्याचे भांडणा झाले. यावेळी वडिल विनायक नागनाथ बिराजदार यांनी मुलगा महादेव बिराजदार याला शिवीगाळ करुन जिवे मारण्याच्या उद्देशाने काठी पोटावर, डाेक्यात आणि इतर ठिकाणी जबर मारहाण करुन मुलाचा खून केला.

याबाबत मयत महादेव बिराजदार यांच्या पत्नी पार्वती महादेव बिराजदार (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन किल्लारी पोलिस ठाण्यात वडिल विनायक बिराजदार याच्याविराेधात गुरनं. २३० / २०२३ कलम ३०२, ५०४ भादंविप्रमाणे शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक नानासाहेब लिंगे करत आहेत.

Web Title: in Latur Murder of the child by the father