शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लातूर जिल्ह्यात दर आठवड्यास होतेय एक दलघमी पाणी कमी

By हरी मोकाशे | Updated: April 6, 2024 17:24 IST

उन्हं अन् पाणी वापरामुळे मध्यम प्रकल्पातील साठ्यात घट

लातूर : वाढत्या उन्हामुळे पारा ४२ अं. से. वर पोहोचल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. परिणामी, बाष्पीभवनाचाही वेग वाढला आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा अधिक जाणवत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. वाढते उन्हं आणि पाणी वापरामुळे दर आठवड्यास एक दलघमी पाणी कमी होत आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह अन्य नद्या, नाले वाहिले नाहीत. परतीचाही पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. त्याचबरोबर विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यास डिसेंबरपासून पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. महिनाभरापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे जलसाठ्यातील बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. शिवाय, आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा वापर होत असल्याने दिवसेंदिवस जलसाठ्यात घट होत आहे. विशेष म्हणजे, मध्यम प्रकल्पातील साठ्यात दर आठवड्यास एक दलघमी पाणी कमी होत आहे.

सध्या केवळ ७.८८ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक....प्रकल्प - साठा टक्केतावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - ७.८०तिरु - ००देवर्जन - ९.८२साकोळ - १४.१६घरणी - १०.२७मसलगा - २२.९५एकूण - ७.८८

गेल्या वर्षी ५० दलघमी जलसाठा...गेल्या वर्षी चांगले पर्जन्यमान झाले होते. शिवाय, परतीचा पाऊस झाला होता. त्यामुळे जलसाठे तुडुंब भरले होते. गेल्या वर्षीच्या एप्रिलमधील पहिल्या आठवड्यात ८ मध्यम प्रकल्पांत ५०.७७५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा केवळ ९.६३१ दलघमी पाणी उपलब्ध आहे. विशेषत: तावरजा, व्हटी आणि तिरु मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत.

तारीख - प्रत्यक्षात उपयुक्त साठा...२८ फेब्रुवारी - १४.०१४६ मार्च - १३.१३५१३ मार्च - १२.५०१२० मार्च - ११.४५९२७ मार्च - १०.५१७३ एप्रिल - ९.६३१

लघु प्रकल्पांत १० टक्के पाणी...जिल्ह्यात लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत एकूण १३४ तलाव आहेत. त्यातील पाण्याचा उपयोग हा सर्वाधिक पशुधनासाठी होतो. सध्या या तलावांमध्ये उपयुक्त जलसाठा ३१.५२३ दलघमी आहे. त्याची १०.०३ अशी टक्केवारी आहे.

मसलगा प्रकल्पात सर्वाधिक पाणी...निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात प्रत्यक्षात उपयुक्त साठा सर्वाधिक असून तो ३.१३१ दलघमी आहे. रेणापूर प्रकल्पात १.६०४, देवर्जनमध्ये १.०४९, साकोळ- १.५५०, घरणी मध्यम प्रकल्पात २.३०७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी