- राजकुमार जाेंधळेलातूर - ‘घरबसल्या कमवा लाखो रुपये’ अशा जाहिरातींना भुलणे लातूरच्या एका तरुणाला भलतेच महागात पडले. ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर भामट्यांनी एका ३४ वर्षीय तरुणाला २४ लाख ५९ हजार ३५२ रुपयांचा गंडा घातला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूरच्या प्रकाशनगर भागात पवनकुमार राजकुमार गंडले हे सध्या बेरोजगार आहेत. याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. टेलिग्रामवर खाते काढून एका अज्ञाताने फिर्यादीशी संपर्क साधला. आपण ‘सीओएस’ कंपनीचे एजंट असल्याचे सांगून, घरबसल्या ऑनलाईन गुंतवणूक केल्यास मोठे ‘कमिशन’ मिळेल, असे आमिष त्याने दाखवले.
भामट्याने लावला फसवणुकीचा सापळा !भामट्याने फिर्यादीला विश्वास बसवण्यासाठी सुरुवातीला एका लिंकवर नोंदणी करायला लावली. प्रारंभीच्या तीन व्यवहारांत फिर्यादीने ७४ हजार ७२१ रुपये भरले. त्यावर परतावा म्हणून आरोपीने १ लाख १३ हजार १३ रुपये परत केले. आपला फायदा होत आहे, हे पाहून फिर्यादीचा विश्वास बसला. याच विश्वासाचा फायदा घेत आरोपीने त्यांना मोठ्या गुंतवणुकीला प्रवृत्त केले.
तब्बल १४ वेळा केले ट्रान्झॅक्शन...मोठ्या नफ्याच्या आमिषाला बळी पडून पवनकुमार यांनी विविध यूपीआय आणि बँक खात्यांवर तब्बल १४ वेळा पैसे पाठवले. अशा प्रकारे त्यांनी एकूण २४ लाख ५९ हजार ३५२ रुपये गुंतवले. मात्र, जेव्हा त्याने मुद्दल आणि कमिशन परत मागितले, त्यावेळी आरोपीने पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवनकुमार यांनी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात धाव घेतली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नागरिकांनाे, अनाेळखी लिंकला क्लिक करु नका...नागरिकांनाे, अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. टेलिग्राम, व्हॉट्सॲपवर येणाऱ्या गुंतवणुकीच्या आमिषांना बळी पडू नका. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी खात्री करावी, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.
Web Summary : A 34-year-old from Latur lost ₹24.59 lakh to cybercriminals promising high returns on online investments. The victim was lured via Telegram with initial profits, then defrauded with larger investment demands. Police advise caution against unknown links and investment schemes.
Web Summary : लातूर के एक 34 वर्षीय युवक को ऑनलाइन निवेश के नाम पर साइबर अपराधियों ने 24.59 लाख रुपये का चूना लगाया। टेलीग्राम के माध्यम से शिकार को पहले मुनाफे का लालच दिया गया, फिर बड़े निवेश की मांग करके धोखा दिया गया। पुलिस ने अज्ञात लिंक और निवेश योजनाओं से सावधान रहने की सलाह दी है।