शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

सोयाबीनची आवक घटली; दर घसरले, खाद्यतेलास मागणीही कमी

By हरी मोकाशे | Updated: December 23, 2023 19:27 IST

पावसाने ताण दिल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

लातूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन डीओसीची मागणी घटल्याने आणि देशात खाद्यतेलाची मागणी उतरल्याचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसत आहे. सध्या बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली असतानाही दरात घसरण झाली आहे. शनिवारी ४ हजार ७२० रुपये प्रति क्विंटल असा सर्वसाधारण भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

गत खरीपात जिल्ह्यात साडेचार लाखापेक्षा अधिक हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. दरम्यान, पावसाने ताण दिल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या राशी करुन थेट बाजारपेठेत विक्री करण्यास सुुरुवात केली होती. सुरुवातीस दरात वाढ झाली नव्हती. मात्र दीपावलीच्या सणाच्या कालावधीत आवक वाढूनही दरात वाढ झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावण्यास सुरुवात झाली. आगामी काळात आणखीन दर वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली.

सण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण होण्यास सुुरुवात झाली. ५ हजार २०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलेला दर आता ४ हजार ७२० रुपयांपर्यंत उतरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटलमागे जवळपास ५०० रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.

कमाल दरामध्येही घट कायम...दिनांक - आवक - कमाल - किमान - सर्वसाधारण१५ डिसेंबर - १३८९३ - ५०११ - ४६६४ - ४८५०१६ रोजी - ९८३० - ४९६० - ४५५१ - ४८००१८ रोजी - १३२७१ - ४९५१ - ४६०० - ४८००२० रोजी - १२२२४ - ४९०० - ४५०० - ४७८०२१ रोजी - ७५७५ - ४८५० - ४५०० - ४७५०२२ रोजी - ८३१५ - ४७८५ - ४६४३ - ४७२०२३ रोजी - ७९७७ - ४८०० - ४५२१ - ४७२०

आंतरराष्ट्रीय बाजारात डीओसीला मागणी कमी...सोयाबीनचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असतात. यंदा ब्राझिलमध्ये सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याने दर वाढतील अशी अपेक्षा होती. मात्र, अर्जेंटिनामध्ये अधिक उत्पादन झाले आहे. परिणामी, विदेशात डीओसीचे भाव उतरले आहेत. त्यामुळे देशातील डीओसीची निर्यात होत नाही. तसेच देशात खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव उतरले आहेत.- ललितभाई शहा, माजी सभापती, बाजार समिती.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूर