कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी हॉटेल व्यावसायिकांचा पुढाकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:24 IST2021-08-19T04:24:58+5:302021-08-19T04:24:58+5:30

शहरातील हॉटेल्स - ४५० शहरातील सुरू हॉटेल - ४४० हॉटेलमध्ये कार्यरत कर्मचारी संख्या - ८,५०० काहींचे लसीकरण पुर्ण, काहींचे ...

Hoteliers take initiative to vaccinate employees! | कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी हॉटेल व्यावसायिकांचा पुढाकार!

कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी हॉटेल व्यावसायिकांचा पुढाकार!

शहरातील हॉटेल्स - ४५०

शहरातील सुरू हॉटेल - ४४०

हॉटेलमध्ये कार्यरत कर्मचारी संख्या - ८,५००

काहींचे लसीकरण पुर्ण, काहींचे बाकी...

हॉटेल १ - औसा रोडवरील एका हॉटेलमध्ये विचारणा केली असता, २० पैकी १८ कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस झाले आहेत, तर दोघा जणांचे पहिले डोस झालेले आहेत. दुसऱ्या डोससाठी महिनाभराचा कालावधी असल्याचे हॉटेल मालकांच्या वतीने सांगण्यात आले.

हॉटेल २ - शहरातील एका हॉटेलमध्ये सर्वच कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. यासाठी स्वत: हॉटेल चालकाने पुढाकार घेतला असून, स्वत: कर्मचाऱ्यांची नाेंदणी करून लसीकरण पूर्ण करून घेतले आहे. त्यामुळे या हॉटेलमधील सर्वच कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्याचे चित्र आहे.

मनपाकडे पाठपुरावा...

कोरोनामुळे मागील काही दिवस हॉटेल बंद होत्या. आता रुग्णसंख्या कमी झाल्याने हॉटेल व्यवसाय सुरू झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण बाकी आहे. त्यांच्यासाठी मनपाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. लवकरच कॅम्प घेऊन सर्वाचे लसीकरण होईल.

- प्रसाद उदगीरकर, हॉटेल व्यावसायिक

लसीकरणावर भर...

हॉटेल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास प्रशासनाने मुभा दिली आहे. कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे आमच्याकडे कार्यरत कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बहुतांश जणांचे लसीकरणाचे दोन डोस झाले आहेत. काही जणांचा दुसरा डोस बाकी आहे.

- प्रवीण कस्तुरे, हॉटेल व्यावसायिक

रस्त्यावरील टपऱ्यांवर आनंदी आनंद...

कोरोनामुळे काही दिवस सर्वच हाॅटेल बंद होत्या. त्यामुळे सर्वच व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

परिस्थिती पूर्वपदावर येत असून, हॉटेल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने मुभा देण्यात आली आहे.

रस्त्यावरील चहा टपरीसह नाश्ता सेंटरवर कोरोना नियमांचे पालन करीत नागरिकांना सेवा दिली जात आहे.

व्यवसाय सुरू ठेवण्यास वाढीव वेळ दिल्याने आर्थिक उलाढाल वाढत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.

Web Title: Hoteliers take initiative to vaccinate employees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.