लातूरमध्ये सहा महसूल मंडळात अतिवृष्टी; उसाचे फड आडवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 18:12 IST2021-09-09T18:11:42+5:302021-09-09T18:12:01+5:30

आतापर्यंत ७२० मि.मी. पाऊस बरसला

Heavy rains in six revenue boards in Latur; The cane stalks are horizontal | लातूरमध्ये सहा महसूल मंडळात अतिवृष्टी; उसाचे फड आडवे

लातूरमध्ये सहा महसूल मंडळात अतिवृष्टी; उसाचे फड आडवे

ठळक मुद्देपुराच्या पाण्यात दोघे गेले वाहून...

लातूर : जिल्ह्यात बुधवारी सकाळी आठवाजेपर्यंत ३६ तर आतापर्यंत ७२० मि.मी. पाऊस झाला असून, बुधवारी सर्वाधिक पाऊस अहमदपूर तालुक्यात ९८.१ मि.मी. इतका झाला आहे. याच तालुक्यातील पाच महसूल मंडळात आणि देवणी तालुक्यातील एका महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पाऊस होत असून, बुधवारी पावसाने उघडीप दिली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील मांजरा, रेणा, तावरजा नदी दुथडी वाहत असून, जिल्ह्याच्या शिवारांतील उसाचे पीक आडवे झाले आहे. अहमदपूर महसूल मंडळात १००, खंडाळी १२०.८, किनगाव १६६.५, अंधोरी ७५.३, हडोळती ८६.०० आणि देवणी महसूल मंडळात ६७ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पापैकी तिरु, देवर्जन, रेणा शंभर टक्के भरले आहेत. तर व्हटी ७६, साकोळ ९६, घरणी ९५, मसलगा मध्यम प्रकल्प ५७ टक्के भरला असून, तावरजा मध्यम प्रकल्प मात्र जोत्याखाली आहे.

हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या

तिरु, देवर्जन, रेणामधून विसर्ग...
आठ मध्यम प्रकल्पापैकी तिरु, देवर्जन, रेणा हे तीन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले असून, यातून विसर्ग करण्यात आला आहे. कानडी बोरगाव, वांजरखेडा, टाकळगाव, कारसापोरेगाव, निवळी, साई बॅरेजेस शंभर टक्के भरले असून, त्यातूनही विसर्ग करण्यात आला आहे.

पुराच्या पाण्यात दोघे गेले वाहून...
अहमदपूर तालुक्यातील हदगळ आणि मावलगाव येथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दोघाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देवणी तालुक्यातील बोरोळ आणि लखनगाव येथे मोठा पाऊस झाल्याने गावाचा काही काळ संपर्क तुटला होता. मात्र, पाऊस थांबल्यानंतर जनजीवन सुरळीत झाले.

Web Title: Heavy rains in six revenue boards in Latur; The cane stalks are horizontal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.