Latur Rain: औराद परिसराला मुसळधार पावसाने झोडपले; पाऊण तासात ५५ मि.मी., शेतशिवार पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 17:54 IST2021-07-18T17:53:33+5:302021-07-18T17:54:18+5:30

Heavy Rain in Latur: तेरणा नदीवरील बॅरेजेस भरले असून, औराद, तगरखेडा येथील बॅरेजेसचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

Heavy rains lashed Aurad area Latur; 55 mm per hour, farmland under water | Latur Rain: औराद परिसराला मुसळधार पावसाने झोडपले; पाऊण तासात ५५ मि.मी., शेतशिवार पाण्याखाली

Latur Rain: औराद परिसराला मुसळधार पावसाने झोडपले; पाऊण तासात ५५ मि.मी., शेतशिवार पाण्याखाली

औराद शहाजानी (जि. लातूर) : औराद शहाजानी व परिसरात रविवारी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला असून, अवघ्या पाऊनतासात ५५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परिसरातील अनेक गावांचा शिवार पाण्याखाली आला आहे. परिसरातील नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. औराद शहाजानी तसेच कासार बालकुंदा, तगरखेडा, सावरी, बोरसुरी, शेळगी, मानेजवळगा, तांबाळा आदी गावांना पावसाने झोडपले असून, या गावांचा शिवार पाण्याखाली आहे. या गावांना जोडणारे अंतर्गत रस्त्यांवरही पाणी वाहत आहे. या गावांच्या शिवाराला नदीचे स्वरूप आले असून, परिसरात तेरणा नदी दुथडीभरून वाहत आहे.

तेरणा नदीवरील बॅरेजेसचे दरवाजे उघडले...
तेरणा नदीवरील बॅरेजेस भरले असून, औराद, तगरखेडा येथील बॅरेजेसचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तब्बल पाऊनतास झालेल्या या पावसात जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक अंतर्गत रस्ते बंद झाले आहेत. दरम्यान, शेतशिवारांमध्ये कंबरेच्यावर पाणी आल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवघ्या पाऊन तासामध्ये ५५ मि.मी. पाऊस झाल्याने शेतशिवारांमध्ये ठेवलेले शेतीचे साहित्य वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मेघगर्जनेसह झालेल्या या पावसामुळे तेरणाकाठच्या गावांना मोठा फटका बसला आहे. औराद येथून जाणा-या ७५२ राष्ट्रीय महामार्गावरून पाणी वाहत आहे.

औराद, तगरखेडा, शेळगी, सावरी, तांबाळा, तांबाळावाडी, बोरसुरी आदी गावात अनेक घरांनी पाणी घुसले असून, संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.

Web Title: Heavy rains lashed Aurad area Latur; 55 mm per hour, farmland under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.