शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

मेहुण्याच्या लग्नाला आला अन् मारहाणीत जावयाचा जीव गेला; दाेन जण ताब्यात

By राजकुमार जोंधळे | Published: April 29, 2024 1:59 AM

याबाबत भादा पाेलिस ठाण्यात नातेवाईकांविराेधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यत सुरू हाेती.

धाराशिव येथून चुलत मेहुण्याच्या लग्नासाठी सासरवाडीत आलेल्या एका जावयाचा मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याची घटना औसा तालुक्यातील एकंबी तांड्यावर रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत भादा पाेलिस ठाण्यात नातेवाईकांविराेधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यत सुरू हाेती.

पाेलिसांनी सांगितले, मृत जावई अंकुश विनायक पवार (वय ३० रा. धाराशिव) हे रविवारी सकाळी एकंबी तांडा येथे मेहुण्याच्या लग्नासाठी कुटुंबासह आले हाेते. दुपारी १२:४५ वाजता विवाहापूर्वीच सासऱ्याच्या शेजाऱ्यासोबत मेहुणीला बोलण्याबराेबरच दारासमोर वाहन का थांबविले, या कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. यावेळी जावई अंकुश पवार यांना शेजाऱ्यांनी काठी, लोखंडी रॉडने डोक्यात जबर मारहाण केली. त्यात ते गंभीर जमखी झाले. त्यांना लातूरला उपचारासाठी घेऊन जाताना वाटेतच मृत्यू झाला. लातुरातील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

तांड्यावर तणाव; फाैजफाटा दाखल... - तू मेहुणीबद्दल माझ्या मुलाकडे का विचारणा केली? यासह इतर कारणावरून जावयाचा केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. घटनेनंतर लग्नासाठी जमलेल्या पाहुण्यासह तांड्यावर काही वेळ तणावाचे वातावरण हाेते. दरम्यान, पोलिसांचा फाैजफाटा दाखल झाल्यानंतर तणाव निवळला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर नियाेजित विवाह साेहळा पार पडला, अशी माहिती सपोनि. राहुलकुमार भोळ यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस