‘युपीएससी’मध्ये हर्षवर्धन तिडकेची बाजी; स्वयंअध्ययनातून पेलले यशाचे शिवधनुष्य !

By राजकुमार जोंधळे | Updated: March 7, 2026 04:11 IST2026-03-07T04:11:38+5:302026-03-07T04:11:52+5:30

देशात ३५५ वी रँक : दुसऱ्या प्रयत्नामध्ये यश

Harshvardhan Tidke's success in UPSC; He achieved success through self-study! | ‘युपीएससी’मध्ये हर्षवर्धन तिडकेची बाजी; स्वयंअध्ययनातून पेलले यशाचे शिवधनुष्य !

‘युपीएससी’मध्ये हर्षवर्धन तिडकेची बाजी; स्वयंअध्ययनातून पेलले यशाचे शिवधनुष्य !

राजकुमार जोंधळे 

लातूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये पांगरी (ता. परळी वैजनाथ, जि. बीड) येथील मूळचा रहिवासी व लातुरात वास्तव्याला असलेल्या हर्षवर्धन अशोकराव तिडके याने देशात ३५५ वी रँक मिळविली. कुठलीही खासगी शिकवणी न लावता हर्षवर्धनने स्वयंअध्ययनातून युपीएससीचे हे शिवधनुष्य पेलले आहे.

अंबाजोगाई येथील न्यू व्हिजन पब्लिक स्कूलमध्ये हर्षवर्धनचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर ६ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमध्ये झाले. त्यानंतर आयआयटी बॉम्बे पवई येथे बीटेकचे शिक्षण झाले. त्यानंतर हर्षवर्धनने युपीएससीची तयारी सुरू केली. त्यानंतर पहिल्या प्रयत्नात हर्षवर्धनच्या पदरी अपयश आले. मात्र त्याने खचून न जाता पुन्हा जिद्दीने, अभ्यासात सातत्य ठेवले. दररोज किमान आठ ते दहा तास अभ्यास केला. स्वयंअध्ययन करीत त्याने यशाचा झेंडा रोवला आहे. आई गृहिणी, तर वडील लातुरात कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आई-वडिलांनी दिलेले पाठबळ आणि प्रोत्साहनाच्या बळावर हर्षवर्धनने हे नेत्रदीपक यश खेचून आणले आहे. चिकाटी अन्‌ जिद्दीचे फलित आहे.

रोज सकाळी २ तास 
वर्तमानपत्राचे वाचन...
हर्षवर्धनचे वडील अशोकराव तिडके म्हणाले, रोज सकाळी उठल्यानंतर तो दोन तास चार ते पाच वर्तमानपत्रांचे वाचन करीत होता. त्यानंतर जवळपास आठ तास अभ्यास करायचा. पहिल्या प्रयत्नात यशाने हुलकावणी दिली. मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने देशात ३५५ वी रँक मिळविली, हे यश विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी प्रेरणरादायी आहे.

Web Title : हर्षवर्धन तिडके ने यूपीएससी में सफलता प्राप्त की; स्व-अध्ययन से मिली सफलता!

Web Summary : लातूर के हर्षवर्धन तिडके ने यूपीएससी परीक्षा में स्व-अध्ययन के माध्यम से 355वां रैंक हासिल किया। प्रारंभिक असफलता के बावजूद, उन्होंने प्रतिदिन आठ से दस घंटे पढ़ाई करते हुए दृढ़ता दिखाई। माता-पिता के समर्थन से, न्यू विजन पब्लिक स्कूल के पूर्व छात्र ने उल्लेखनीय सफलता प्राप्त की, जो उम्मीदवारों को प्रेरित करती है।

Web Title : Harshvardhan Tidke Cracks UPSC with Self-Study; Achieves Success!

Web Summary : Harshvardhan Tidke from Latur secured 355th rank in UPSC exam through self-study. Despite initial failure, he persisted, studying eight to ten hours daily. With parental support, this New Vision Public School alumnus achieved remarkable success, inspiring aspirants.