लातूर तालुक्यातील चिकुर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत हरंगुळ खु. आरोग्यवर्धिनी उपकेंद्र आहे. या उपकेंद्रातून १३ सेवा पुरविल्या जातात. येथील उपकेंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्रासारखी रुग्णांची दररोज नोंदणी असते. त्याचबरोबर सेवा पुरविल्या जातात. आयुष्मान भारतअंतर्गत केंद्रीय मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट आरोग्यवर्धिनी उपकेंद्र पुरस्कारावर हरंगुळ खु. उपकेंद्राने आपले नाव कोरले आहे. त्याबद्दल उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अनिता वाघमारे, आरोग्यसेवक महेश माळवदे, आरोग्यसेविका एस.जी. दामा तसेच आशा स्वयंसेविकांचे कौतुक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोनिका पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक सारडा, डॉ. पंडगे, डॉ. रणदिवे आदींनी कौतुक केले.
देशपातळीवर नाव पोहोचवू...
हरंगुळ खु.येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणे आरोग्यसेवा दिल्या जातात. सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट कार्य असल्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक आहे. यापुढेही अशाच प्रकारे जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रातून आणखीन दर्जेदार सुविधा देण्यावर भर राहणार आहे. आरोग्यक्षेत्रात जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचविण्याचा प्रयत्न राहणार आहे.
- डॉ. गंगाधर परगे,
जिल्हा आरोग्य अधिकारी, लातूर.
***