राज्य शासनाने गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू विक्रीस बंदी घातली आहे. मात्र, शहरासह जिल्ह्यात अवैधरीत्या विक्री करण्यात येत आहे. लातुरातील खाडगाव रोड येथील राजकुमार रामदास शिंदे यांच्या घरात गुटखा, पानमसाल्याचा साठा करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास मिळाली. त्यावरून अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. एस. लोंढे यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाच्या मदतीने धाड टाकली. यात ४ लाख ८७० रुपयाचा गुटखा, पानमसाला जप्त करण्यात आला. याप्रकरणी साठा मालक राजकुमार शिंदे याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. एस. लोंढे यांनी केली. त्यांना विशाल सोमवंशी, स्थानिक गुन्हा शाखेचे योगी, गाडेकर, साखरे, लांडगे यांनी सहकार्य केले.