लातूरच्या गंजगोलाईतील किराणा दुकान आगीत खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 12:06 IST2019-03-07T12:05:08+5:302019-03-07T12:06:39+5:30

तासाभरात आग आटोक्यात आली. त्यामुळे या परिसरातील बाजारपेठेचे मोठे नुकसान टळले.

a grocery shop burn in Latur's Ganjgolai area | लातूरच्या गंजगोलाईतील किराणा दुकान आगीत खाक

लातूरच्या गंजगोलाईतील किराणा दुकान आगीत खाक

लातूर : लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई परिसरात गुरुवारी सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास परिवार किराणा दुकानाला अचानक आग लागली. या भीषण आगीत किराणा दुकान खाक झाले असून शेजारील मोबाईल शॉपीचेही मोठे नुकसान झाले आहे.

गंजगोलाई येथे मुजीब महंमद हुसेन शेख यांचे परिवार दुकान आहे. त्यांच्या दुकानाला सकाळी अचानक आग लागली. या आगीत दुकान खाक झाले असून अंदाजे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा पोलिसांनी केला आहे. या किराणा दुकानाच्या शेजारी असलेल्या अहमद उस्मान शेख यांच्या फॉरेव्हर मोबाईल शॉपीलाही आग लागली. पीओपी जळून सुमारे २० हजारांचे नुकसान झाले आहे. आग इतकी भीषण होती की परिसरात धुराचे लोट पसरले होते. दरम्यान, अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण केल्यानंतर दोन बंब आले. या पथकाने आग विझविण्याचा प्रयत्न केला अन् तासाभरात आग आटोक्यात आली. त्यामुळे या परिसरातील बाजारपेठेचे मोठे नुकसान टळले.

Web Title: a grocery shop burn in Latur's Ganjgolai area